Divorce Paper | कपूर घरण्याला नवं टेन्शन! नेमकी कुठे ठेवलीयत राजीव कपूरच्या घटस्फोटाची कागदपत्र?

दिवंगत अभिनेता राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांच्या मालमत्ता वादाबाबत कपूर कुटुंबात एक नवीन तणाव निर्माण झाला आहे. राजीव कपूर यांच्या घटस्फोटाची कागदपत्रे (Divorce paper) नेमके कुठे ठेवली आहेत, हे सध्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला ठाऊक नाही.

Divorce Paper | कपूर घरण्याला नवं टेन्शन! नेमकी कुठे ठेवलीयत राजीव कपूरच्या घटस्फोटाची कागदपत्र?
राजीव कपूर
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 10:38 AM

मुंबई : दिवंगत अभिनेता राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांच्या मालमत्ता वादाबाबत कपूर कुटुंबात एक नवीन तणाव निर्माण झाला आहे. राजीव कपूर यांच्या घटस्फोटाची कागदपत्रे (Divorce paper) नेमके कुठे ठेवली आहेत, हे सध्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला ठाऊक नाही. राजीव कपूरच्या घटस्फोटाची कागदपत्रे मिळवण्यात असमर्थ असलेले त्यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. कुटुंबातील लोक अद्याप घटस्फोटाची कागदपत्र शोधत आहेत (Rajiv Kapoor Divorce paper case kapoor family searching papers).

राजीव कपूर यांचे 9 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते राज कपूर यांचे सर्वात धाकटे चिरंजीव होते. त्यांचे भाऊ रणधीर कपूर आणि बहीण रीमा जैन यांनी त्यांच्या संपत्तीवर दावा करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे.

हायकोर्टाने मागितले कागद

सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने मालमत्तेवरील विवाद सोडवण्याच्या सुनावणीदरम्यान राजीव कपूर यांच्या मालमत्तेची आवश्यकता असल्यास त्यांनी राजीव यांच्या घटस्फोटाची कागदपत्र न्यायालयात आणली पाहिजेत, ज्यात राजीव कपूर यांच्या घटस्फोटाची ऑर्डर असली पाहिजे.

यावर कुटुंबीयांनी आपली बाजू मांडताना म्हटले की, राजीव कपूरने 2001 मध्ये आरती सबरवाल नावाच्या महिलेशी लग्न केले आणि 2003 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. परंतु कोणत्या कौटुंबिक न्यायालयात हा घटस्फोट झाला याची कल्पना कुटुंबाला नाही.

रणधीर कपूर यांनी माध्यमांना सांगितले की, त्यांचा भाऊ राजीव मुंबईत राहत होता आणि कधी कधी पुण्यात जायचा. अशा परिस्थितीत घटस्फोटाची कागदपत्रे नेमकी कुठे ठेवली आहेत, हे त्यांना माहित नाही. त्यांचा शोध घेतला जात आहे

उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी असा आदेश दिला आहे की, कपूर कुटुंबाला पेपर्स सादर करण्यापासून सूट दिली जाऊ शकते, परंतु आरती सबरवाल यांच्याकडून त्यांना तशी मान्यता मिळाली पाहिजे, जेणेकरून पुढे वाद कोणतेही होऊ नयेत (Rajiv Kapoor Divorce paper case kapoor family searching papers).

राजीव कपूर एकटेच राहत होते!

राजीव कपूर यांनी आपल्या कारकीर्दीत ‘राम तेरी गंगा मैली’ नावाचा एक मोठा सुपरहिट चित्रपट दिला. हा चित्रपट वडील राज कपूर यांनी बनवला होता, पण मंदाकिनीने त्याच्या यशाचे सर्व श्रेय घेतले. यामागील एक कारण म्हणजे या चित्रपटातील तिची अत्यंत बोल्ड भूमिका. त्यानंतर राज कपूर यांनी त्यांच्यासाठी कोणताही चित्रपट बनवला नाही, ज्यामुळे राजीव त्यांच्या वडिलांवर नाराज झाले आणि कुटुंबापासून वेगळे राहू लागले.

दुसरीकडे त्यांचे दोन्ही मोठे भाऊ, ऋषी कपूर आणि रणधीर यांचे करिअर चालू होते. यामुळे त्यांच्या मनात हीन भाव आला होता. 2001मध्ये त्यांचे लग्न झाले, मात्र ते दोन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकले नाही. त्यामुळे राजीव नैराश्याला बळी पडला.

व्यस्त वेळापत्रकांमुळे कुटुंबातील सदस्यही त्यांना जास्त वेळ देऊ शकले नाहीत. ते कपूर परिवाराबरोबर फक्त सण किंवा वाढदिवसाच्या प्रसंगी दिसत होते. राज कपूर यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेतही त्यांना थोडाच वाटा मिळाला होता.

(Rajiv Kapoor Divorce paper case Kapoor family searching papers)

हेही वाचा :

मुंबई शहराला “युनेस्को क्रिएटिव्ह सिटी फॉर फिल्म”चा दर्जा, लोगोचे महापौरांच्या हस्ते अनावरण

Prateik Babbar | आईला दिली हृदयात जागा! प्रतीक बब्बरने छातीवर कोरला स्मिता पाटीलच्या नावाचा टॅटू

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.