Ranbir-Alia wedding: लग्नानंतरची पहिली दृश्यं एक्स्क्लुझिव्ह! आलिया-रणबीर विवाहबंधनात अडकले

Video Alia Ranbir Wedding : अखेर लग्न लागल्यानंतरची पहिली दृश्य समोर आली आहे. लग्नानंतर रणबीर आणि आलिया यांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी मुंबईतीतल बंगल्याबाहेर गर्दी केली होती.

Ranbir-Alia wedding: लग्नानंतरची पहिली दृश्यं एक्स्क्लुझिव्ह! आलिया-रणबीर विवाहबंधनात अडकले
रणबीर आलियाच्या लग्नानंतरची पहिली दृश्यImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 9:45 PM

मुंबई : अभिनेता रणबीर-आलिया (Ranbir Alia wedding) मुंबईत विवाहबंधनात अडकले. नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याची (Celebrity Wedding) अनेकांना उत्सुकता होती. अखेर लग्न लागल्यानंतरची पहिली दृश्य समोर आली आहे. लग्नानंतर रणबीर आणि आलिया यांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी मुंबईतीतल बंगल्याबाहेर गर्दी केली होती. माध्यमांचे कॅमेरेही हा क्षण टिपण्यासाठी एकवटले होते. अखेर मोठ्या उत्साहात आणि थाटामाटत हा लग्नसोहळा संपन्न झाल्यानंतर रणबीर आणि आलियाच्या चेहऱ्यावर संपूर्ण सोहळ्याचा आनंद झळकत होता. मुंबईतील रणबीरच्या ‘वास्तू’ या (Vastu Residence, Mumbai) निवासस्थानी हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी मोजकेच पाहुणे या लग्नसोहळ्यासाठी उपस्थित होते. कपूर आणि भट्ट कुटुंबीयांसोबत बॉलिवूडमधील निवडक लोकांना या लग्नसोहळ्यानं निमंत्रण देण्यात आलं होतं.

रणबीर आणि आलियानं साध्या पद्धतीनं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाबी विवाहपद्धतीनुसार हा लग्नसोहळा पार पडला. लग्नाच्या विधींसाठी या दोघांनी घरातील त्यांची सर्वांत आवडती जागा निवडली होती.

पाहा व्हिडीओ :

…आणि आलियाला रणबीरनं उचलून घेतलं!

दरम्यान, यावेळी लग्नसोहळा पार पडल्यानंतर आलिया आणि रणबीरनं चाहत्यांच्या शुभेच्छाही स्वीकारल्यात. तसंच माध्यमांचे कॅमेरेही बचाचवेळ या दोघांच्या प्रतीक्षेत होते. नवविवाहीत दाम्पत्यानं यावेळी माध्यमाच्या कॅमेऱ्यांसमोर एकत्र पोझही दिली.

फोटोसेशन झाल्यानंतर रणबीर कपूरनं आलीयाला उचलून घेतलं आणि तसाच रणबीर पुन्हा आतमध्ये जाण्यासाठी निघाला. यावेळी आलियाच्या आणि रणबीरच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.

पाहा व्हिडीओ :

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.