मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बाॅलिवूडमधील सर्वाच चर्चेत असलेली नावे आहेत. काही दिवसांपूर्वीच आलियाला मुलगी झालीये. आलिया आणि रणबीर यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आलियाने मुलीच्या नावाचा अर्थही सांगून टाकला आहे. रणबीर आणि आलिया दोघेही जास्त वेळ हा आपल्या मुलीसोबतच घालवत आहेत. सौदी अरेबिया येथे रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये रणबीर कपूर याने हजेरी लावली होती.
रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये रणबीर कपूर याने चित्रपटांविषयी अनेक गोष्टींवर चर्चा केली. इतकेच नाही तर मुलीचा बाप झाल्यापासून रणबीर खूप जास्त आनंदी आहे. मात्र, यादरम्यानच त्याला असुरक्षित देखील वाटत असल्याचे रणबीर याने सांगितले.
रणबीर म्हणाला की, मुलगी झाल्यामुळे मी खूप जास्त खुश आहे. परंतू मला असुरक्षित देखील वाटत आहे. रणबीर म्हणाला मी हा विचार करतोय की या सर्व गोष्टी करण्यासाठी मी इतका जास्त वेळ का घेतला?
मी हा विचार करतो की, मी ज्यावेळी 60 वर्षांच्या होईल. त्यावेळी माझी मुले 20-21 वर्षांची असतील मग मी त्यांच्यासोबत फुटबॉल खेळू शकेल? त्यांच्यासोबत पळू शकेल? हे थोडे वेगळे विचार असल्याचे देखील रणबीर याने सांगितले.
यापूर्वी आयुष्यामध्ये कधीच असा विचार केला नसल्याचे देखील यावेळी रणबीर कपूर याने सांगितले. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी तब्बल 5 वर्ष डेट करून लग्नाचा निर्णय घेतला. यांच्या लग्नाचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
रणबीर आणि आलिया यांच्या मुलीचे नाव नीतू कपूर यांनी ठेवले आहे. चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून यांच्या लेकीची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, रणबीर किंवा आलिया यांनी कोणीच राहाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही.