कधीकाळी बच्चन खानदानाची होणार होती सून, पण सासेर बुवासोबत तो सीन केला आणि…

एका मुलाखतीत राणीला एकदा प्रश्न विचारला तुझी आवडती अभिनेत्री कोणती असा प्रश्न विचारला असता, तिने म्हटले की माझ्या पिढीतील ऐश्वर्या राय आणि प्रिती झिंटा ! त्यानंतर जेव्हा साल 2017 मध्ये ऐश्वर्या राय यांच्या वडीलाचे निधन झाले. त्यावेळी राणी जुन्या मैत्रीणीच्या सांत्वनाला गेली होती. परंतू त्यानंतर पुन्हा त्या दोघी एकत्र आल्याचे दिसले नाही.

कधीकाळी बच्चन खानदानाची होणार होती सून, पण सासेर बुवासोबत तो सीन केला आणि...
rani Mukerji And Aishwarya Rai Bachchan fight
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 7:29 PM

रुपेरी पडद्यावरील मोहमयी दुनियेत सेलिब्रिटीचं नातं जुळतं बिघडतं. कधी कधी सिनेमाच्या सेटवर झालेली तोंड ओळख नंतर घट्ट मैत्रीत परावर्तित होते. त्यांच्या मैत्रीचं उदाहरण दिले जाते. अनेकदा मैत्री होते तर अगदी शत्रूत्व देखील होते. सौदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी या एकेकाळच्या घट्ट मैत्रिणी होत्या. त्यानंतर त्यांच्यात अचानक शत्रुत्व सुरु झाले. मैत्रितील दूर मिटलेली नाही. राणी मुखर्जी ही बच्चन कुटुंबियाची सून देखील होणार होती. परंतू एका चित्रपटात तिने बिग बी यांच्या सोबत तो इंटिमेंट सीन केला आणि तिचा पत्ता कट झाल्याचे म्हटले जात आहे. असे काय झाले चला पाहूयात काय नेमका काय किस्सा आहे हे पाहूयात…

ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांच्यात घट्ट मैत्री होती. दोघी मैत्रिणी एकमेकींच्या सुख आणि दुखात सामील होत होत्या. अनेक इव्हेंटमध्ये त्या दोघी एकत्र असत. ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांच्यात मैत्रीला नजर लागली. साल 2003 मध्ये चलते चलते या चित्रपटासाठी शाहरुख खान आणि ऐश्वर्या या दोघांनी कास्ट केले होते. शुटींग देखील सुरु झाली होती, या चित्रपटात अचानक ऐश्वर्या राय हीचा पत्ता कट झाला आणि राणी मुखर्जीला कास्ट केले गेले.

त्यावेळी ऐश्वर्या आणि सलमान यांच्यात ब्रेकअप सुरु झाले होते. सलमान सेटवर जाऊन हंगामा करीत असल्याने ऐश्वर्या राय हीला काढण्यात आले होते..त्यानंतर काजोल हीला शाहरुख खान याने चलते चलते ची ऑफर दिली होती. परंतू तिने नकार दिल्यानंतर राणी मुखर्जीला हा चित्रपट मिळाला. त्यानंतर ऐश्वर्या आणि राणी यांच्या नात्यात दरार पडली. ऐश्वर्या हीला आपली फसवणूक झाल्यासारखे वाटले.राणी आणि शाहरुख दोन्ही तिचे मित्र असूनही दोघांनीही तिला विश्वासात न घेतल्याने ती चिडली होती.

या दोघींच्या मैत्रीणीत फूट पडण्यामागे अभिषेक बच्चन देखील कारणी भूत होता. अभिषेक आणि राणी मुखर्जी यांच्यात ‘बंटी और बबली’, ‘कभी अलविदा न कहना’, ‘बस इतना सा ख्वाब है’ अशा चित्रपटामुळे चांगली मैत्री झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. भन्साली यांच्या ब्लॅक चित्रपटात बिग बि अमिताभ आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यात चुंबन दृश्य चित्रित झाले होते. त्यामुळे जया बच्चन यांनी सून म्हणून राणी नको होती असे म्हटले जाते.

दिग्दर्शक मणी रत्नम यांच्या धीरुभाई अंबानी यांच्या जीवनावर बेतलेल्या ‘गुरु’ चित्रपटात अभिषेक आणि ऐश्वर्या राय एकत्र आल्याने त्यांच्या मेतकुट जुळले.त्यानंतर साल 2007 मध्ये त्यांनी लग्न केले.परंतू राणीला या लग्नाला बोलावले नाही. त्यामुळे राणी आणि ऐश्वर्यात आणखी नातं बिघडले.एका मुलाखती राणीने म्हटले होते की तिने जर मला लग्नाला बोलावले असते तर मी नक्की गेली असती. त्यानंतर मात्र दोघीमध्ये बोलचाल झाल्याचे पुरावे नाही, त्यानंतर साल 2014 मध्ये इटलीत जाऊन निर्माता आदित्य चोपडा याच्याशी राणीने लग्न केले. यानंतर तिला मुलगी झाली तिचे नाव अदिरा असे आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.