रणवीर सिंहच्या ताफ्यात आणखी एक ‘शानदार’ गाडी, जाणून घ्या या कारची किंमत आणि फीचर्स   

कोरोना विषाणूच्या संसर्गाआधी अर्थात 2019च्या शेवटी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने लँबोर्गिनी उरुस घेतल्याची चर्चा सुरु होती. मात्र, त्याला त्याची ड्रीम कार मिळण्यासाठी चक्क 2 वर्ष गेली.

रणवीर सिंहच्या ताफ्यात आणखी एक ‘शानदार’ गाडी, जाणून घ्या या कारची किंमत आणि फीचर्स   
रणवीर सिंह
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 4:15 PM

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाआधी अर्थात 2019च्या शेवटी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने लँबोर्गिनी उरुस घेतल्याची चर्चा सुरु होती. मात्र, त्याला त्याची ड्रीम कार मिळण्यासाठी चक्क 2 वर्ष गेली.  आता शेवटी त्याला त्याच्या नवीन गाडीची डिलिव्हरी मिळाली आहे. नुकतीच भारतात लॉन्च करण्यात आलेली लँबोर्गिनी उरुस (Lamborghini urus) पर्ल कॅप्सूल व्हेरियंट रणवीर सिंहच्या हातात आलेलं आहे. कॉस्मेटिक अपग्रेड पॅकेजसह ही कार नव्याने लॉन्च झाली आहे. उरुसची किंमत जवळपास 3.15 कोटी रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. त्याच्या पर्ल कॅप्सूल व्हेरिएंटवर 20 टक्के प्रीमियम मिळतो (Ranveer Singh bought luxurious Lamborghini urus pearl capsule edition car).

रणवीर सिंहच्या या उरुस पर्ल कॅप्सूल व्हेरियंटला कँडी ऑरेंज शेड देण्यात आला आहे, ज्याला अरन्सीओ बोरेलिस म्हणतात. या एसयूव्हीचे सौंदर्य वाढवण्यासाठी अपग्रेडमध्ये ग्लॉसी-ब्लॅक फिनिश बम्पर्स, ओआरव्हीएम, बॉडी स्कर्ट, व्हील क्लॅडींग आणि रूफ यांचा समावेश आहे. क्वाड एक्झॉस्ट टिप्स ब्रश केलेल्या सिल्व्हर डार्क मॅट फिनिश देण्यात आले आहे. हे लक्षात घेण्याजोगे आहे की, पर्ल कॅप्सूल प्रकार असूनही, रणवीर सिंगची उरुस विशेष प्रकारातील मॉडेलसह मानक स्वरूपात आलेल्या 23-इंच टॅगेट केलेल्या चाकांऐवजी 22 इंचाच्या चाकांवर चालते. ही कार आतून कशी दिसते, हे अद्याप सिक्रेटच आहे. गाडीच्या हेडरेस्टवर लँबोर्गिनीचा लोगो आहे.

100 किमी प्रतितास फक्त 3.6 सेकंदात!

लँबोर्गिनी उरूस पर्ल कॅप्सूल व्हेरियंटला त्याच्या 4.4-लिटर टर्बोचार्ज्ड V 8 इंजिनपासून पॉवर मिळते, जी 641 bhp आणि 850 NM पीक टॉर्क तयार करते, ज्याची जोडणी 8 स्पीड ऑटोमॅटिक आहे. ही कार 0-100 किमी प्रतितास वेगाने केवळ 3.6 सेकंदात गती वाढवू शकते आणि तिचा वेग 305 किमी प्रतितास आहे, ज्यामुळे ती जगातील सर्वात वेगवान एसयूव्ही म्हणून ओळखली जाते (Ranveer Singh bought luxurious Lamborghini urus pearl capsule edition car).

रणवीरच्या गाड्यांचा ताफा

रणवीर सिंहच्या लक्झरी गॅरेजमध्ये मर्सिडिज-बेंझ जीएलएस, अ‍ॅस्टन मार्टिन रॅपिड एस, लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग, ऑडी क्यू 5, जॅग्वार एक्सजे एल आणि मारुती सुझुकी सियाज या गाड्यांसह आता लँबोर्गिनी उरुसही सामील झाली आहे. दरम्यान, कार्तिक आर्यन, रोहित शेट्टी, पुनीत राजकुमार, आदर्श पूनावाला, मुकेश अंबानी यांनी देखील ही गाडी खरेदी केली आहे.

(Ranveer Singh bought luxurious Lamborghini urus pearl capsule edition car)

हेही वाचा :

बॉलिवूडच्या ‘या’ चॉकलेट हिरोसोबत रोमान्स करायचाय, मुलाखतीदरम्यान समांथाने व्यक्त केली इच्छा!  

Devmanus | ‘देवमाणूस’ अखेर पोलिसांच्या तावडीत सापडणार? अभिनेत्याने फोटो शेअर करत दिले संकेत!

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.