मुंबई : रॅपर धर्मेश परमार (Rapper Dharmesh Parmar) याचं निधन झालंय. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. धर्मेश एमसी तोडफोड (MC TodFod) म्हणून ओळखला जातो. धर्मेश हा मूळचा मुंबईचा. तो स्ट्रीट रॅपर्स ग्रुपमध्ये होता. तो गुजराती रॅपसाठीही खूप प्रसिद्ध होता. रणवीर सिंहच्या गली बॉय या चित्रपटाचा साउंडट्रॅक धर्मेशचा होता. त्याने या ट्रॅकला आवाज दिला होता. स्वदेशी नावाच्या सिंगिंग बँडचा तो भाग होता. या बँडने धर्मेशच्या निधनाची बातमी दिली. धर्मेशच्या कारचा अपघात झाल्याची माहिती आहे. त्याच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. अनेकांनी त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
स्वदेशी बँडने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत धर्मेशच्या निधनाची माहिती दिली आहे. त्याच्या खास शैलीत त्यांनी धर्मेशला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या ‘स्वदेशी बॅन्डने त्याच्या परफॉर्मन्सचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. आणि त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
कोण आहे रॅपर धर्मेश?
धर्मेश परमार हा मुंबईतील प्रसिद्ध रॅपर आहे. तो रॅप गाण्यांमधला प्रसिद्ध चेहरा आहे. त्याची गाणी तरूणाईला भावतात. त्याने रणवीर सिंगच्या गली बॉय सिनेमासाठीही काम केलं होतं. या सिनेमातील साउंडट्रॅक त्याने तयार केला होता. त्याने यासाठी गायनही केलं होतं.
मुंबईतील बीडीडी चाळीत राहणाऱ्या लोकांचं जगणं रॅप या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्याच्या मनात असा वेगळा विचार येणं आणि त्याने असा तो प्रत्यक्षात उतरवणं याचं विशेष कौतुक झालं. त्यांच्या रॅपिंग शैलीला ‘कॉन्शस रॅपिंग स्टाईल’ म्हणतात. त्यांची गाणी लोकांच्या विचारांशी मिळतीजुळती होती. त्याचे कुटुंब त्याच्या कामाचं विशेष कौतुक करत. त्याने घरातील परंपरांना मोडून नवा मार्ग निवडल्याने घरातील लोक त्याचं कौतुक करत. धर्मेशने राजीव दीक्षित यांना आपला आदर्श मानत असे. त्यांच्याच म्हणण्यानुसार त्याने ‘स्वदेशी’ बँड सुरू केला.
संबंधित बातम्या