Rashmika Mandanna | बिग बींसोबत स्क्रीन शेअर करणार ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदना, लवकरच चित्रीकरणाला होणार सुरुवात!

नॅशनल क्रश’ ठरलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna ) आता बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमवणार आहे. एकामागून एक मोठे चित्रपट रश्मिकाच्या पदरात पडले आहेत. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासमवेत रश्मिका पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे.

Rashmika Mandanna | बिग बींसोबत स्क्रीन शेअर करणार ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदना, लवकरच चित्रीकरणाला होणार सुरुवात!
रश्मिका मंदना आणि अमिताभ बच्चन
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 11:19 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. अमिताभ यांच्या चाहत्यांची यादी बरीच लांब आहे. फॅन्ससुद्धा अमिताभ यांच्या ‘डॅशिंग’ स्वभावाचे चाहते आहेत. नुकतीच अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली. ही माहिती स्वत: अमिताभ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. आता त्यांच्या आगामी ‘गुडबॉय’(Good Boy) या चित्रपटाविषयी एक अपडेट समोर आली आहे (Rashmika Mandanna first time sharing screen with Amitabh bachchan for upcoming good boy film).

अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीचा (Emraan Hashmi) यांचा आगामी ‘चेहरे’ हा चित्रपट 9 एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. मात्र, कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता, या चित्रपटाचे रिलीज लांबणीवर टाकले जाऊ शकते. अशा परिस्थितीत आता अमिताभ यांच्या नव्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.

बिग बींसोबत स्क्रीन शेअर करणार ‘नॅशनल क्रश’ रश्मिका

‘नॅशनल क्रश’ ठरलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna ) आता बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमवणार आहे. एकामागून एक मोठे चित्रपट रश्मिकाच्या पदरात पडले आहेत. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासमवेत रश्मिका पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. ‘गुडबॉय’ या चित्रपटात रश्मिका आणि अमिताभ बच्चन एकत्र दिसणार आहेत.

कधी सुरु होणार चित्रपटाचे शूटिंग?

अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती की, त्यांच्या डोळ्यामध्ये त्रास होत असून, लवकरच शस्त्रक्रिया होईल. माहिती देताना अमिताभ यांनी ‘गुडबॉय’ या नव्या चित्रपटाविषयीही अपडेट दिली होती. बातमीनुसार, ‘गुडबॉय’ पुढील आठवड्यापासून सुरु केला जाणार आहे. अर्थात 5 किंवा 6 एप्रिलपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे (Rashmika Mandanna first time sharing screen with Amitabh bachchan for upcoming good boy film).

चित्रपटाच्या मुख्य भागाचे चित्रीकरण चंदीगडमध्ये होणार आहे. तसेच, शहरातील चित्रीकरणासाठी काही भाग मुंबईतील एका स्टुडिओमध्ये बनवण्यात आले आहेत. पहिले वेळापत्रक सुमारे एक महिना सुरु असणार आहे. तर, त्यानंतर कलाकार चंदिगड आणि हरिद्वार येथे स्वतंत्र कार्यक्रमांसाठी जातील. याआधी पहिले शेड्युल 23 मार्चपासून सुरू होणार होते.

‘गुडबॉय’ हा चित्रपट एकता कपूरचे प्रॉडक्शन हाऊस बालाजी टेलीफिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी तयार केले आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या सोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

‘चेहरे’ लांबणीवर पडण्याची शक्यता

अमिताभ बच्चन यांचा आगामी ‘चेहरे’ या चित्रपटाच्या रिलीजवर टांगती तलवार आहे. अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटाला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. दिग्दर्शक रुमी जाफरी या चित्रपटाचे प्रदर्शन आणखी लांबणीवर टाकू शकतात, असे बोलले जात आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी 17 जुलैला प्रदर्शित होणार होता, पण कोरोना संसर्गामुळे त्याला ब्रेक लागला होता. आता पुन्हा एकदा या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यासोबतच अभिनेत्री रिया चक्रवर्ती या चित्रपटात असल्यामुळे चित्रपटावर बहिष्कार टाकला जाण्याची भीतीही मेकर्सना वाटत आहे.

(Rashmika Mandanna first time sharing screen with Amitabh bachchan for upcoming good boy film)

हेही वाचा :

नवे गाणे प्रदर्शित होण्यापूर्वीच काळाचा घाला, प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू

Video : ‘सजदे किए है लाखो…’ रितेश-जेनेलियानं साजरी केली रोमॅन्टिक होळी!

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.