Rashmika Mandanna | रश्मिकाने गुपचूप उरकला साखरपुडा? बोटातील अंगठी पाहून चाहत्यांमध्ये कुजबुज…

सध्या रश्मिकाकडे चित्रपटांचीही मोठी रांग आहे. यादरम्यान रश्मिकाने तिचा असा एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

Rashmika Mandanna | रश्मिकाने गुपचूप उरकला साखरपुडा? बोटातील अंगठी पाहून चाहत्यांमध्ये कुजबुज...
रश्मिका मंदना
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 12:51 PM

मुंबई : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) सध्या बरीच चर्चेत असते. अभिनेत्रीची एक झलक मिळवण्यासाठी चाहते नेहमीच वाट बघत असतात. रश्मिका देखील तिच्या चाहत्यांशी संपर्क साधण्याची कोणतीही संधी सोडत नाही. ती दररोज तिचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत असते, जे तिच्या चाहत्यांनाही खूप आवडतात. अलीकडे रश्मिकाचा एक फोटो व्हायरल होत आहे, मात्र हा फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे (Rashmika Mandanna flaut ring photo on social media).

अभिनेत्री रश्मिका ‘नॅशनल क्रश’ देखील ठरली होती. रश्मिकाने आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ केले आहे. सध्या रश्मिकाकडे चित्रपटांचीही मोठी रांग आहे. यादरम्यान रश्मिकाने तिचा असा एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

पाहा रश्मिकाचा नवीन फोटो

अलीकडेच रश्मिकाने असा एक फोटो शेअर केला आहे, की तो फोटो पाहून राष्मिकाने गुपचूप साखरपुडा उर्क्ल्याची चर्चा सुरु आहे. रश्मिकाने बोटात रिंग घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. वास्तविक, होळीच्या निमित्ताने रश्मिकाने सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि तिच्या इंस्टा स्टोरीवर काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर रिंग परिधान करताना दिसली. यासह, हे फोटो शेअर करताना, रश्मिकाने एक अतिशय गोड संदेश देखील लिहिला आहे, ज्यानंतर तिचा साखरपुडा झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही अंगठी रश्मिकाला तिच्या चाहत्यांनी भेट म्हणून पाठवली आहे. रश्मिकाने स्वतः एक मेसेज लिहित ही बाब स्पष्ट केली आहे. येत्या 5 एप्रिल रोजी रश्मिकाचा वाढदिवस आहे आणि यावेळी तिचा 25वा वाढदिवस असणार आहे. अशा परिस्थितीत रश्मिकाला वाढदिवसापूर्वीच एक खास भेट मिळाली आहे (Rashmika Mandanna flaut ring photo on social media).

रश्मिकाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

‘नॅशनल क्रश’ ठरलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna ) आता बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमवणार आहे. एकामागून एक मोठे चित्रपट रश्मिकाच्या पदरात पडले आहेत. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासमवेत रश्मिका पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. ‘गुडबॉय’ या चित्रपटात रश्मिका आणि अमिताभ बच्चन एकत्र दिसणार आहेत.

कधी सुरु होणार चित्रपटाचे शूटिंग?

अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती की, त्यांच्या डोळ्यामध्ये त्रास होत असून, लवकरच शस्त्रक्रिया होईल. माहिती देताना अमिताभ यांनी ‘गुडबॉय’ या नव्या चित्रपटाविषयीही अपडेट दिली होती. बातमीनुसार, ‘गुडबॉय’ पुढील आठवड्यापासून सुरु केला जाणार आहे. अर्थात 5 किंवा 6 एप्रिलपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.

(Rashmika Mandanna flaut ring photo on social media)

हेही वाचा :

Parineeti Chopra | ‘सायना’गर्ल परिणीती चोप्राचा ‘टॉपलेस’ अवतार, बोल्ड लूक पाहून चाहते म्हणतायत…

Kirron Kher | बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर यांना रक्ताचा कर्करोग, मुंबईत उपचार

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.