कोरोना काळात एकमेकांना मदत करताना पाहून भावूक झाली रिया चक्रवर्ती, म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. या साथीच्या काळात सर्वांना मदत करण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

कोरोना काळात एकमेकांना मदत करताना पाहून भावूक झाली रिया चक्रवर्ती, म्हणाली...
रिया चक्रवर्ती
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 11:31 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. या साथीच्या काळात सर्वांना मदत करण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. काही काळापूर्वी रियाने एक पोस्ट शेअर केली होती आणि लोकांकडे मदतीचा हात पुढे केला. ती कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत लोकांना मदत करण्यासाठी पुढे आली आहे. आता या कठीण काळात लोक एकमेकांना मदत करताना पाहून रियाचे मन भरून आले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने आनंद व्यक्त केला (Rhea Chakraborty share post on social media for helping corona patients).

रियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिच्या कठीण काळात एकमेकांच्या बाजूने उभ्या असलेल्या लोकांचे कौतुक केले आहे. तिने लिहिले की, ‘या कठीण काळात लोक एकमेकांना मदत करत आहेत हे पाहून मला आनंद होतो. हे इतिहासात लिहिले जाईल. यावेळी एकमेकांना मदत करा, त्यांना चांगले वाटेल आणि एकमेकांचा तिरस्कार करु नका. एकमेकांचा द्वेष करु नका आणि एकत्र ही लढाई जिंकूया. जणू या जगात पुन्हा एकदा माणुसकीची सुरुवात होत आहे. विश्वास ठेवा.’

पाहा रिया चक्रवर्तीची पोस्ट

Rhea 1

रियाची पोस्ट

आईसाठी शेअर केली पोस्ट

नुकताच ‘मदर डे’च्या निमित्ताने रिया चक्रवर्ती हिने आपल्या आईबरोबर स्वतःच्या बालपणीचा एक क्युट फोटो शेअर केला होता. तसेच त्यांनी सांगितले की, तिने दिलेल्या शिकवणीची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. रियाने फोटो शेअर करताना लिहिले, ‘माझी सुंदर आई, मी लहान असताना तू मला सांगितले होते मला आठवते की, आनंद तुझ्यात आहे, तो बाहेर शोधू नकोस. नेहमी आपल्या हृदयात प्रेम शोध आणि तू नेहमी आनंदी राहा. आई, मी हे नेहमी लक्षात ठेवेन आणि मी वचन देते की सर्वतोपरी प्रयत्न करत राहीन (Rhea Chakraborty share post on social media for helping corona patients).

लोकांसाठी पुढे केला मदतीचा

रियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही काळापूर्वी पोस्ट शेअर केली होती आणि लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. तिने लिहिले, ‘या कठीण काळात एकत्र राहणे महत्वाचे आहे. आपण जशी जमेल तशी सर्व मदत करा. मग ते छोटी असो किंवा मोठी. मी कोणत्याही प्रकारे तुम्हाला मदत करू शकत असल्यास मला थेट मेसेज करा. मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. काळजी घ्या.’

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर रिया चक्रवर्ती लवकरच अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीसमवेत ‘चेहरे’ या आगामी चित्रपटात दिसणार आहेत. एप्रिल महिन्यात हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, पण आता याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.

(Rhea Chakraborty share post on social media for helping corona patients)

हेही वाचा :

Video | ‘डोन्ट रश’ म्हणत शालूने दाखवला सोशल मीडियावर जलवा, चाहते म्हणतायत ‘अगयायाया लई खतरनाक डान्स है’!

Photo: केप टाऊनच्या समुद्र किनारी निक्की तांबोळीची धम्माल, दिसली हॉट अवतारात

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.