मुंबई : अभिनेत्री चड्ढाने एक ट्वीट केलंय. या ट्वीटमुळे ती चर्चेत आली आहे. भारतीय लष्काराचा तीने अपमान केल्याचं काहीचं म्हणणं आहे. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे ते, जाणून घेण्यासाठी सविस्तर वृत्त इथं वाचा. दरम्यान, अभिनेत्री रिचा चड्ढा हिचं नेमकं शिक्षण किती झालं आहे, याचा आढावा यानिमित्ताने घेणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानणाऱ्या रिचा चड्ढाने अनेक सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत. फुकरे सिनेमातील भूमिकेसोबत गँग्स ऑफ वासेपूस सिनेमातील ती अधिक प्रसिद्ध झाली. दरम्यान, वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांमुळे आणि सोशल मीडियातील आक्रमकतेमुळे ती नेहमीच चर्चेत असते.
रिचा चड्ढा हीचं शालेय शिक्षण नवी दिल्ली येथे झालं. सरदार पटेल विद्यालय या शाळेत ती शिकली. त्यानंतर मुंबईच्या सोफिया कॉलेजात तिने पुढचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पुन्हा ती दिल्लीत गेली. दिल्लीतल सेंट स्टिफन्स कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला.
The industry makes hue n cry over boycott calls & fall-off of BO. But are they on corrective measures? Doesn’t look so!
Problem is not these few irrelevant ppl who sunk the film industry image with their career, problem is those also who remains silent.
#RichaChadha pic.twitter.com/tbRj8pes7R
— The Hawk Eye (@thehawkeyex) November 24, 2022
रिचा चड्ढा बॅचलर इन हिस्ट्री आहे. म्हणजेच तिने इतिहास या विषयात पदवी घेतलीय. त्यानंतर तिने पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा देखील केला. सोशल कम्युनिकेशन्स मीडिया या विषयात तिने पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केल्याची माहिती देखील एका वेबसाईटने दिली आहे.
रिचा चड्ढा मूळची पंजाबमधील आहे. तिचा जन्म 18 डिसेंबर 1986 साली अमृतसर इथं झाली. रिचा चड्ढा हीचे वडील एक मॅनेजमेन्ट कंपनी चालवतात. तर तिची आई प्राध्यापिका आहे.
सोमेश चड्ढा आणि डॉ. कुसुम लता चड्ढा असं तिच्या आईवडिलांचं नाव आहे. दिल्ली विद्यापीठाच्या पीजीडीएव्ही कॉलेजमध्ये तिची आई प्राध्यापिका आहे. त्या पॉलिटिकल सायन्स हा विषय शिकवतात. शिवाय त्यांची 3 पुस्तकही प्रकाशित झाली आहेत.
रिचा चड्ढाला दहावीत 82 टक्के इतके गुण मिळाले होते. तिला फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. पंजाबमध्ये झालेल्या खलिस्तानी दंगलीनंतर चड्ढा कुटुंबीय पंजाबमधून दिल्लीत स्थलांतरी झाले होते. तिचे आजोबा हे स्वातंत्र्यसेनानी होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर तिचे आजोबा सर्जन म्हणून सैन्यात रुजू झाले होते. तिच्या आजोबांचं नाव लेफ्टनंट कर्नल धर्मवीर प्रसाद आहे.
@BediSaveena pic.twitter.com/EYHeS75AjS
— RichaChadha (@RichaChadha) November 24, 2022
उत्तरी लष्कराचे कमांड लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं होतं, की भारतीय सेना ही पाकव्याप्त काश्मीरला पुन्हा मिळवण्यासारखे आदेश अंमलात आणायला तयार आहे. त्यावर रिचा चड्ढा हीने गलवानने हाय म्हटलंय, असा टोला लगावला होता. त्यामुळे तिच्या अनेकांनी निशाणा साधलाय.