RRR | प्रदर्शनाआधीच रेकॉर्ड ब्रेक कमाई, ‘इतक्या’ कोटींमध्ये विकले गेले ‘RRR’चे हक्क!

दक्षिण इंडस्ट्रीचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajamouli) सध्या आपल्या आगामी ‘आरआरआर’ (RRR film) चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. हा चित्रपट यावर्षी 13 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

RRR | प्रदर्शनाआधीच रेकॉर्ड ब्रेक कमाई, ‘इतक्या’ कोटींमध्ये विकले गेले ‘RRR’चे हक्क!
आरआरआर
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 4:29 PM

मुंबई : दक्षिण इंडस्ट्रीचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajamouli) सध्या आपल्या आगामी ‘आरआरआर’ (RRR film) चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. हा चित्रपट यावर्षी 13 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, आज (2 एप्रिल) अजय देवगणचा (Ajay Devgn) या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये अजय देवगण दमदार स्टाईलमध्ये दिसला आहे. अशा परिस्थितीत आता एसएस राजामौली यांनी ‘आरआरआर’चे नॉर्थ इंडियन थिएट्रिकल राईट्स पेन स्टुडिओला विकल्याचे समोर आले आहे (RRR film SS Rajamouli sold RRR north indian theatrical rights for 140 Crore).

या चित्रपटाची हिंदी आवृत्ती प्रॉडक्शन हाऊसद्वारेच प्रदर्शित केली जाईल. ‘बाहुबली’ नंतर एस.एस. राजामौलीचा हा दुसरा चित्रपट आहे, जो सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तसेच, जयंतीलाल गडा यांनी 1900च्या दशकावर आधारित या चित्रपटाचे सर्व भाषांमधील इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि सॅटेलाईट अधिकार खरेदी केले आहेत.

आणखी 200 कोटींचा करार

अशा परिस्थितीत पिंकविलाच्या अहवालानुसार एस.एस. राजामौली आणि जयंतीलाल गाडा यांच्यात नॉर्थ इंडियन थिएट्रिकल राईट्ससाठी विशेष करार झाला आहे. बॉलिवूड स्टुडिओने हिंदी डब सॅटेलाईट, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक हक्क यासह सुमारे 200 ते 210 कोटी रुपयांच्या करारास अंतिम मान्यता दिली आहे. व्यापारिक स्त्रोतानुसार जयंतीलाल गडा यांनी हिंदी आवृत्तीच्या सॅटेलाईट, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक हक्कांमध्ये 50% भागीदारी घेतली आहे. याचा अर्थ असा की, जर चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 100 कोटींची कमाई केली, तर जयंतीलाल यांना थेट 50 कोटी मिळतील.

या चित्रपटाचे आतापर्यंतचे डील पाहता या हक्कांची किंमत 200 कोटी रुपये ठेवली गेली होती, परंतु नॉर्थ इंडियन थिएट्रिकल राईट्स 140 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले आहेत. राजामौलींचा ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठा करार असल्याचे म्हटले जाते आहे (RRR film SS Rajamouli sold RRR north indian theatrical rights for 140 Crore).

‘फार्स फिल्म्स’ सोबत डील

एस. एस राजामौलीच्या ‘आरआरआर’ चित्रपटामध्ये एनटीआर, रामचरण, अजय देवगण, आलिया भट्ट यांच्यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडसह इतर अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. परदेशातील फिल्म डिस्ट्रीब्युशन हाऊस ‘फार्स फिल्म्स’ सोबत राजामौलींनी मोठी डील केली.

केवळ 5 भाषांमध्ये थिएट्रिकल राइट्ससाठी या चित्रपटाला आतापर्यंत 348 कोटीहून अधिक ऑफर मिळाल्या आहेत. जेव्हापासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली तेव्हापासून चित्रपटाला तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळमच्या थिएट्रिकल राइट्ससाठी एकूण 348 कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे. निजाममध्ये 75 कोटी, आंध्र प्रदेशात 165 कोटी, तामिळनाडूमध्ये 48 कोटी, मल्याळममध्ये 15 कोटी आणि कर्नाटकमध्ये 45 कोटी हा सर्व आकडा मिळून 348 कोटी रुपये होत आहे. तसेच या चित्रपटाला बॉलिवूडकडून देखील मोठ्या ऑफर्सही मिळत आहेत.

(RRR film SS Rajamouli sold RRR north indian theatrical rights for 140 Crore)

हेही वाचा :

Happy Birthday Ajay Devgn | बिग बींच्या घरासमोर दाखवायचा स्टंट, आता बॉलिवूडच’सिंघम’ म्हणून ओळखला जातोय अजय देवगण!

Dia Mirza | 39 व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाह, दीड महिन्यात बेबी बम्प, दिया मिर्झाच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.