Big News | वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ‘RRR’, हिंदीच नव्हे जगातील अनेक भाषांमध्ये होणार प्रदर्शित!
यंदाच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या आरआरआरसंदर्भात एक मोठी घोषणा झाली आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट डिजिटली देखील रिलीज होईल. चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या डिजिटल भागीदारांची घोषणा केली आहे, असे व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट केले आहे.
मुंबई : दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajmouli) यांच्या आगामी ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जेव्हापासून चित्रपटाची घोषणा झाली आहे, तेव्हापासून चाहते त्याच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आरआरआरचा फर्स्ट लूकही चाहत्यांसाठी आता सादर करण्यात आला आहे. नुकतीच या चित्रपटाविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे (RRR new update RRR movie will release in multiple languages on OTT platforms).
यंदाच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या आरआरआरसंदर्भात एक मोठी घोषणा झाली आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट डिजिटली देखील रिलीज होईल. चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या डिजिटल भागीदारांची घोषणा केली आहे, असे व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट केले आहे.
एक व्हिडीओ शेअर केला गेला आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘चित्रपटाचे डिजिटल प्रवाहातील भागीदार झी 5 तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड आहेत. याशिवाय नेटफ्लिक्सही हिंदी देखील आहे. झी सिनेमा हिंदी, स्टार प्लस तेलुगु, स्टार प्लस तमिळ, एशियननेट मल्याळम, स्टार कन्नड हे सॅटेलाईट भागीदार आहेत. डिजिटल स्ट्रीमिंग पार्टनर(परदेशी भाषा) देखील नेटफ्लिक्स(इंग्लिश, कोरियन, टर्किश और स्पॅनिश) असणार आहे.
पाहा ट्विट
IT’S OFFICIAL… Besides releasing in #Hindi, #Telugu, #Tamil, #Malayalam and #Kannada, #RRR will also release in various foreign languages: #English, #Portuguese, #Korean, #Turkish and #Spanish… The digital streaming rights are with Netflix… OFFICIAL POSTER… pic.twitter.com/IWDbPIiJox
— taran adarsh (@taran_adarsh) May 26, 2021
(RRR new update RRR movie will release in multiple languages on OTT platforms).
कोट्यावधी रुपयांत विकले हक्क
पिंकविलाच्या वृत्तानुसार, आरआरआरचे निर्माते आणि वितरकांनी चित्रपटाच्या डिजिटल, उपग्रह आणि इलेक्ट्रॉनिक हक्क विक्री करारावर सही केली आहे. बातमीनुसार हिंदीतील चित्रपटाचे थियेट्रिकल रिलीज 140 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. चित्रपटाचे हक्क कोट्यवधी रुपयांना विकल्या गेल्याचे बोलले जात आहे. बातमीनुसार, झी ग्रुपला आरआरआर जाहीर झाल्यानंतर निर्मात्यांनी उपग्रह आणि डिजिटल हक्क (सर्व भाषा) 325 कोटी रुपयांना विकले आहेत.
तथापि, निर्मात्यांनी कोणत्याही प्रकारच्या हक्क विक्रीच्या मुद्द्यावर अद्याप अधिकृत खुलासा केलेला नाही. अशा परिस्थितीत हा करार खरोखर निश्चित झाला आहे की नाही, हे आपण सांगू शकत नाही (RRR new update RRR movie will release in multiple languages on OTT platforms).
आणखी 200 कोटींचा करार
अशा परिस्थितीत पिंकविलाच्या अहवालानुसार एस.एस. राजामौली आणि जयंतीलाल गडा यांच्यात नॉर्थ इंडियन थिएट्रिकल राईट्ससाठी विशेष करार झाला आहे. बॉलिवूड स्टुडिओने हिंदी डब सॅटेलाईट, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक हक्क यासह सुमारे 200 ते 210 कोटी रुपयांच्या करारास अंतिम मान्यता दिली आहे. व्यापारिक स्त्रोतानुसार जयंतीलाल गडा यांनी हिंदी आवृत्तीच्या सॅटेलाईट, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक हक्कांमध्ये 50% भागीदारी घेतली आहे. याचा अर्थ असा की, जर चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 100 कोटींची कमाई केली, तर जयंतीलाल यांना थेट 50 कोटी मिळतील.
या चित्रपटाचे आतापर्यंतचे डील पाहता या हक्कांची किंमत 200 कोटी रुपये ठेवली गेली होती, परंतु नॉर्थ इंडियन थिएट्रिकल राईट्स 140 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले आहेत. राजामौलींचा ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठा करार असल्याचे म्हटले जाते आहे.
ज्युनिअर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, समुथिरकानी आणि अॅलिसन डूडी यांच्यासह अनेक भारतीय प्रसिद्ध कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. हा सर्वात मोठा हिट भारतीय चित्रपट ठरणार आहे.
(RRR new update RRR movie will release in multiple languages on OTT platforms)
हेही वाचा :
नवे ‘रामयुग’ पाहून संतापले ‘शकुनी मामा’, ‘भगवान श्रीरामा’चा नवा अवतार पाहून गुफी पेंटल म्हणाले…