अर्जुनच्या ‘त्या’ कृत्यामुळे महानायकासमोर व्हावे लागले खजील, सचिन तेंडुलकरने सांगितला किस्सा…

क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar) आज आपला 48वा वाढदिवस साजरा करत आहे. यावर्षी सचिन तेंडुलकर आपल हा खास दिवस आपल्या कुटुंबासमवेत साजरा करणार आहे.

अर्जुनच्या ‘त्या’ कृत्यामुळे महानायकासमोर व्हावे लागले खजील, सचिन तेंडुलकरने सांगितला किस्सा...
सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 3:35 PM

मुंबई : क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar) आज आपला 48वा वाढदिवस साजरा करत आहे. यावर्षी सचिन तेंडुलकर आपल हा खास दिवस आपल्या कुटुंबासमवेत साजरा करणार आहे. मास्टर ब्लास्टरने अलीकडेच कोरोना विषाणूचा सामना करत, आयुष्याची महत्त्वाची मॅच देखील जिंकली आहे. एरव्ही ताठ मानेने भारताची शान मिरवणाऱ्या सचिन तेंडुलकरला एकदा मुलगा अर्जुन (Arjun Tendulkar) याच्यामुळे बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासमोर तोंड लपवावे लागले होते. चला तर, जाणून घेऊया नेमकं असं काय घडलं की, ज्यामुळे चक्क सचिनला लज्जास्पद वाटलं (Sachin Tendulkar share the story when he faces embracement in front of Amitabh Bachchan).

सचिननेच शेअर केला किस्सा…

‘बिग बीं’च्या 75व्या वाढदिवशी सचिन तेंडुलकरने सर्वांना हा किस्सा सांगितला होता. मिड-डे संभाषणात हा किस्सा सांगताना सचिन म्हणाला की, ‘जेव्हा माझा मुलगा अर्जुन दीड वर्षांचा होता, तेव्हा मी आणि अमिताभ बच्चन एका जाहिरातीचे शूट करत होतो. त्यावेळी अर्जुन देखील आमच्या सोबत तिथे बसला होता. अर्जुन त्यावेळी संत्री खात होता. हातातील संत्रं खाल्ल्यानंतर अचानक त्याने बिग बींच्या कुर्त्याला आपले हात पुसले आणि स्वच्छ केले. त्यावेळी मला आता कुठे तोंड लपवू असे झाले होते. मला तेव्हा खूप लाज वाटली.’

सचिनचा हाच चिमुकला अर्जुन आता 21 वर्षांचा झाला आहे आणि त्याने क्रिकेट विश्वात देखील पदार्पण केले आहे. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळत आहे. बिग बी आणि सचिन अनेकदा मैदानावर एकमेकांना भेटतात आणि ते नेहमीच एकमेकांचा आदर करतात (Sachin Tendulkar share the story when he faces embracement in front of Amitabh Bachchan).

‘उमंग 2013’मध्ये सचिन तेंडुलकरचे कौतुक

2013 मधील उमंग फेस्टिव्हल दरम्यान सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन एकाच मंचावर उपस्थित होते. त्यावेळी अमिताभ बच्चन सचिनबद्दल बोलताना म्हणाले की, मी त्याच्याबरोबर स्टेज शेअर केल्याने मला खूप आनंद झाला आहे. सचिन हा आपल्या देशासाठी खूप महत्वाचा आहे आणि मी त्याच्याबद्दल जितके बोलेन तितके कमीच आहे. सचिनने आपल्या देशाचे नाव जगभरात गाजवले आहे.

सचिनच्या तुलनेवर अमिताभ बच्चन यांचा आक्षेप

सचिन जेव्हा 50 कसोटी सामन्यांमध्ये 100 धावा करणारा पहिला क्रिकेटपटू झाला तेव्हा, त्याची तुलना सर डॉन ब्रॅडमनशी केली गेली. यावर अमिताभ बच्चन संतप्त झाले आणि त्यांनी 2010मध्ये आपल्या ब्लॉगमध्ये याबद्दल लिहिले. त्यांनी लिहिले की, डॉन ब्रॅडमन आणि सचिनमध्ये कोण चांगले आहे यावर वादविवाद का करावा? ही गोष्ट पुढे आणून, आपना लोकांना असे वाटते का की तो या लायक आहे की नाही आणि ते माझ्या दृष्टीने चुकीचे आहे.’

(Sachin Tendulkar share the story when he faces embracement in front of Amitabh Bachchan)

हेही वाचा :

It’s Rumor | अभिनेत्री तबस्सुम यांच्या निधनाची अफवा, उत्तरं देऊन थकलेल्या अभिनेत्रीला बंद करावा लागला फोन!

Rakhi Sawant | ‘आई शपथ माझं लग्न झालंय, पण….’, पतीसोबतच्या नात्यावर राखी सावंतचे पुन्हा मोठे वक्तव्य…  

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.