Karan Johar | नेपोटीझम वाद टाळण्यासाठी करण जोहरची नवी खेळी, अभिनय नव्हे तर ‘या’ क्षेत्रात करणार सैफच्या लेकाला लाँच!

करण जोहरने आतापर्यंत अनेक स्टारकिड्सना लाँच केले आहे. अभिनेत्री आलिया भट्ट,  जान्हवी कपूर, वरुण धवन, अनन्या पांडे यांच्यासह अनेक स्टारकिड्स करणचे बोट पकडून या मनोरंजन विश्वात आले आहेत.

Karan Johar | नेपोटीझम वाद टाळण्यासाठी करण जोहरची नवी खेळी, अभिनय नव्हे तर ‘या’ क्षेत्रात करणार सैफच्या लेकाला लाँच!
इब्राहीम अली खान
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 10:27 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची जोडी पहिल्यांदा ‘गल्ली बॉय’ चित्रपटामध्ये एकत्र दिसली होती. या दोघांचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता पुन्हा एकदा आलिया आणि रणवीरची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. करण जोहरचे (Karan Johar) ‘धर्मा प्रोडक्शन’ ही प्रेमकथा तयार करणार आहे आणि करण जोहर स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) या चित्रपटाद्वारे डेब्यू करणार आहे. सहायक दिग्दर्शक म्हणून तो या चित्रपटात काम करणार आहे (Saif Ali khan son Ibrahim ali khan debuting in Karan Johar upcoming film as assistant director).

करण जोहरने आतापर्यंत अनेक स्टारकिड्सना लाँच केले आहे. अभिनेत्री आलिया भट्ट,  जान्हवी कपूर, वरुण धवन, अनन्या पांडे यांच्यासह अनेक स्टारकिड्स करणचे बोट पकडून या मनोरंजन विश्वात आले आहेत. यामुळे बहुतेक वेळेस करण वर नेपोटीझमचा प्रचार केल्याचा आरोप केला जातो. अशा परिस्थितीत इब्राहिम अली खानला लाँच केले तर, करणला पुन्हा एकदा या टीका सहन कराव्या लागल्या असत्या. म्हणूनच हा वाद टाळण्यासाठी त्याने इब्राहिमला त्याच्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम दिले आहे.

रणवीर दिसणार मॉडर्न लूकमध्ये!

रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी ‘चित्रकूट’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात आहे. रोहित शेट्टी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात आहे. करण जोहरच्या आलिया आणि रणवीर यांच्यासह या चित्रपटाचे शूटिंग जून महिन्यात सुरू करेल. शूटिंग सुरु करण्यापूर्वी दोघेही अभिनयाची कार्यशाळा घेतात, जेणेकरून ते त्यांचे पात्र अधिक चांगल्या प्रकारे साकारू शकतील. रिपोर्ट्सनुसार रणवीर या चित्रपटात एका हटके मॉडर्न लूकमध्ये दिसणार आहे. त्याचवेळी आलियाचा लूक रणवीरच्या तुलनेत अधिक साधा असेल. कोणतीही सामाजिक संदेश नसलेली ही एक प्रेम कथा असणार आहे (Saif Ali khan son Ibrahim ali khan debuting in Karan Johar upcoming film as assistant director).

इब्राहिम डेब्यू करणार नाही!

पिंकविलाच्या अहवालानुसार, इब्राहिम या चित्रपटात केवळ सहायक दिग्दर्शक म्हणून आला आहे. त्याला लाँच करण्याची अद्याप कोणतीही योजना नाही. त्याला फक्त चित्रपट निर्मितीची प्रक्रिया शिकायची आहे. तो आता अभ्यास करत आहे. इब्राहिमला अभिनेता व्हायचं आहे, पण त्याआधी त्याचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. त्यामुळे तो इतक्यात डेब्यू करणार नाही.

सध्या करण जोहरने शेवट ‘ऐ दिल है मुश्कील’ या रोमँटिक ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय बच्चन मुख्य भूमिकेत दिसले होते. त्यानंतर त्याने ‘लस्ट स्टोरी’ आणि ‘घोस्ट स्टोरीज’ या डिजिटल चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. रणवीर आणि आलियाचा हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याचा करणचा मानस आहे.

(Saif Ali khan son Ibrahim ali khan debuting in Karan Johar upcoming film as assistant director)

हेही वाचा :

आमीर नाही, ‘तारे जमीं पर’चा खरा दिग्दर्शक मी होतो, अमोल गुप्तेंना 14 वर्षांनीही खुपते?

Video | ‘बिग बॉस’ फेम सपना चौधरीचे खेसारीलाल यादवसोबत ठुमके, पाहा दोघांचा धमाल व्हिडीओ!

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.