Salman Shahrukh : टायगर 3 मध्ये शाहरुख-सलमानची जोडी एकत्र, एक ॲक्शन सीनसाठी तब्बल ‘इतके’ कोटी
लवकरच टायगर 3 मध्ये शाहरुख-सलमानची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
मुंबई : बॉलिवूडचा भाईजान आणि किंग खान ही जोडी नेहमीच चर्चेत असते. या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. तसंच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेल्या ‘पठाण’ चित्रपटात शाहरुख-सलमान एकत्र पाहायला मिळाले होते. तर आताही हे दोघं पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत.
बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. लवकरच टायगर 3 मध्ये शाहरुख-सलमानची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
निर्माते ‘टायगर 3’ ची जोरदार तयारी करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीयेत. मिळालेल्या माहितीनुसार, टायगर 3 मध्ये शाहरुख खान आणि सलमान खान या दोघांचे जबरदस्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत.
View this post on Instagram
कोणत्याही अॅक्शन सिक्वेन्ससाठी खूप मोठी रक्कम लागते. तसंच या चित्रपटाचे निर्माते शाहरुख-सलमानच्या या सिक्वेन्सच्या शूटमध्ये प्रत्येक बारीकसारीक गोष्टीची काळजी घेत आहेत. या सीनसाठी ते एक वेगळा सेट तयार करत आहेत, ज्याची एकूण किंमत 35 कोटी एवढी असल्याचं समजतंय.
या चित्रपटाचं शूटिंग 8 मेपासून सुरू होण्याची शक्यता आहे. तसंच ज्याप्रमाणे सलमानने पठाण चित्रपटात शाहरुखची मदत केली होती तसंच, या चित्रपटात सलमानला शाहरुख मदत करताना दिसणार आहे. तसंच या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त इमरान हाश्मी आणि कतरिना कैफ देखील दिसणार आहेत. तसंच आदित्य चोप्रा निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक मनीश शर्मा करत आहेत.
शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, या चित्रपटानं केवळ भारतातच नाही तर जगभरात धुमाकूळ होता. या चित्रपटाने 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तसंच हा चित्रपटा बॉलिवूडचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. तर आता टायगर 3 या चित्रपटाबाबतही असंच बोलले जात आहे. हा चित्रपट कमाईच्या बाबतीत शाहरुखच्या पठाणलाही मागे टाकेल, असं म्हटलं जातंय.