Radhe Trailer Review | सलमान खानने तोडला ‘नो किसिंग’ नियम, दिशा पटानीसोबत झाला रोमँटिक!

बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा बहुचर्चित चित्रपट 'राधे-युअर मोस्ट वाँटेड भाई' चा (Radhe) ट्रेलर आज (22 एप्रिल) रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा सलमान आपल्याच स्टाईलमध्ये लोकांचे मनोरंजन करताना दिसतो आहे.

Radhe Trailer Review | सलमान खानने तोडला ‘नो किसिंग’ नियम, दिशा पटानीसोबत झाला रोमँटिक!
सलमान खान आणि दिशा पाटनी
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 3:08 PM

मुंबई : बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा बहुचर्चित चित्रपट ‘राधे-युअर मोस्ट वाँटेड भाई’ चा (Radhe) ट्रेलर आज (22 एप्रिल) रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा सलमान आपल्याच स्टाईलमध्ये लोकांचे मनोरंजन करताना दिसतो आहे. 2 मिनिट 51 सेकंदाचा हा ट्रेलर मुंबई शहरातून सुरू होत आहे, जिथे ड्रग्ज आणि गुन्हेगारी वेगाने वाढत आहे. त्यानंतर शहरात गुन्हेगारी वाढवणार्‍या रणदीप हूडाची एन्ट्री होते. ‘राधे’ म्हणजे सलमान खानला या गुन्ह्याला आळा आणि वेसण घालण्यासाठी बोलावण्यात आले आहे. सलमान आणि रणदीप यांच्यातील लढा या चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट भाग ठरणार आहे (Salman khan fans reaction on disha salman kissing seen in radhe trailer).

ट्रेलरमध्ये दिसली सलमानची खास स्टाईल

या ट्रेलरमध्ये रणदीप हूडा व्हिलनच्या व्यक्तिरेखेत खूप डॅशिंग दिसला आहे. त्याचवेळी दिशा पाटनी देखील यात खूपच सुंदर दिसत होती. ट्रेलरमध्ये जॅकलिन फर्नांडिसचा डान्स नंबरही पाहायला मिळतोय. पण या चित्रपटात अशी एक गोष्ट होती जी चाहत्यांना आश्चर्यचकित करू शकते. एका सीनमध्ये सलमान चक्क दिशाला चुंबन देताना दिसला आहे. या आधी सलमानने कोणत्याही चित्रपटात चुंबन दृश्य दिले नव्हते. त्यामुळे या चित्रपटासाठी ‘भाईजान’ने आपला ‘नो किसिंग’ नियम मोडल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.

एकाचवेळी ओटीटीवरही येणार!

चित्रपटामध्ये सलमानबरोबर अभिनेत्री दिशा पाटणी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. प्रभु देवा दिग्दर्शित हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. थिएटर व्यतिरिक्त प्रेक्षक ‘झी 5’वर ‘पे पर व्हू सेवा ZEEplex सोबतच भारतातील सर्व प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म जे ‘झी 5’शी संबंधित आहेत, तसेच डिश, डी 2 एच, टाटा स्काय आणि एअरटेल हे प्रमुख डीटीएच ऑपरेटर डिजिटलवर हा चित्रपट पाहण्यास सक्षम असतील आणि प्रेक्षकांना त्यांच्या सोयीनुसार चित्रपट पाहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले जातील (Salman khan fans reaction on disha salman kissing seen in radhe trailer).

थिएटर मालकांना केले अपील

जेव्हा सलमानने चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली तेव्हा त्याने चित्रपटगृहांच्या मालकांना सांगितले होते की, त्याचा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी आपल्याला घ्यावी लागेल.

जॉन अब्राहमशी टक्कर!

याक्षणी, सलमान खानचा ‘राधे’ बॉक्स ऑफिसवर जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते 2’शी स्पर्धा करण्यास सज्ज झाला आहे. ‘राधे’ हा चित्रपट 13 मे रोजी रिलीज होत आहे आणि ‘सत्यमेव जयते 2’ देखील त्याच दिवशी रिलीज होईल. यापूर्वी ‘सत्यमेव जयते 2’ 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. पडद्यावर कोणता चित्रपट रसिकांचे मन जिंकतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तथापि, सलमान खानच्या ‘राधे’ समोर ‘सत्यमेव जयते 2’ च्या निर्मात्यांवर अपेक्षांचे ओझे वाढू शकते. त्याचबरोबर जॉनच्या चित्रपटामुळे सलमानच्या ‘राधे’वरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

(Salman khan fans reaction on disha salman kissing seen in radhe trailer)

हेही वाचा :

Video | ‘देशावर संकट येताच ते बघा पळून चालले’, रातोरात न्यूयॉर्कला जाणारे शाहरुख खानचे कुटुंब नेटकऱ्यांकडून ट्रोल!

PHOTO | ‘सिद्धी’ फेम विदुला चौगुलेच्या अदा पाहून चाहतेही म्हणतायत ‘जीव झाला येडापिसा’!

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.