टार्झन, वॉन्टेड आणि दिल मांगे मोर चित्रपटातील अभिनेत्री एकाएकी कुठे झाली गायब?, जाणून घ्या!

2009 मध्ये आयशा सलमान खानसोबत वॉन्टेड या हिट चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यासोबतच सलमान आणि आयेशाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अचानक आयशा बॉलिवूडपासून कशी दूर झाली याबाबत आपण जाणून घ्या.

टार्झन, वॉन्टेड आणि दिल मांगे मोर चित्रपटातील अभिनेत्री एकाएकी कुठे झाली गायब?, जाणून घ्या!
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 10:26 PM

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आली ती अभिनेत्री आयशा टाकिया. आयशा टाकियानं तिच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. ही लोकप्रिय अभिनेत्री आता सिनेसृष्टीपासून लांब आहे. पण ती आता कुठे आहे आणि काय करत आहे? हा प्रश्न भरपूर जणांना पडला असेल. तर जाणून घ्या.

गेल्या काही वर्षांपासून आयशा टाकिया बॉलिवूडपासून दूर आहे. एकेकाळी सिनेसृष्टीत तिच्या नावाची खूप चर्चा व्हायची. आयशानं अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच आयशानं तिच्या सौंदर्यानं चाहत्यांना भुरळ घातली आहे. पण अचानक आयशा बॉलिवूडपासून कशी दूर झाली याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

आयशाने तिच्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात केली होती. तिचा 2004 मध्ये आलेला टार्झन: द वंडर कार हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात ती वत्सल सेठसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती.  तसंच या चित्रपटात अजय देवगणही होता.  प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला होता. या चित्रपटानंतर आयशानं वॉन्टेड, दिल मांगे मोर, सलाम-ए-इश्क यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

‘वॉन्टेड’ चित्रपटातून मिळाली प्रसिद्धी

2009 मध्ये आयशा सलमान खानसोबत वॉन्टेड या हिट चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यासोबतच सलमान आणि आयेशाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या चित्रपटातून आयशा खूप लोकप्रिय झाली होती. तसंच चाहते तिच्या सौंदर्याने वेडे झाले होते. मात्र, कासी वर्षांनंतर ती सिनेसृष्टीपासून दूर गेली आणि आता ती चित्रपटांमध्ये दिसत नाही.

लग्नानंतर सिनेसृष्टीपासून दूर

2009 मध्ये आयशाने फरहान आझमीसोबत लग्न केले.  लग्नानंतर ती सिनेसृष्टीपासून दूर गेली आणि आता तिच्या वैवाहिक जीवनात व्यस्त झाली. त्यानंतर 2017 मध्ये, जेव्हा तिच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली तेव्हा ती खूप चर्चेत आली होती. कारण, शस्त्रक्रियेनंतर तिचा चेहरा विद्रूप झाला होता.

सध्या आयशा चित्रपटांपासून दूर आहे, पण आता ती एड्समध्ये काम करते.  तसंच याआधी ती सोशल मीडियावर सक्रिय होती.  मात्र, गेल्या काही वर्षांपासून ती सोशल मीडियापासूनही दूर आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.