Radhe : सलमान खानच्या ‘राधे’चं ‘सिटी मार’ गाणं आलं; सोशल मीडियावर धुमाकूळ

बॉलिवूडच्या दबंग खाननं अर्थात सलमान खाननं 'सिटी मार' हे बहुप्रतिक्षित गाणं प्रदर्शित केलं आहे. (Salman Khan's' Radhe's' Seeti Maar 'song out; Trending on social media)

Radhe : सलमान खानच्या ‘राधे’चं 'सिटी मार' गाणं आलं; सोशल मीडियावर धुमाकूळ
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 12:59 PM

मुंबई : ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच ‘सिटी मार’  (Seeti Maar) हे गाणं मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सोबतच गेले अनेक दिवस सोशल मीडियावर हा ट्रॅक चर्चेचा विषय ठरतोय. आता, बॉलिवूडच्या दबंग खाननं अर्थात सलमान खाननं (Salman Khan) हे बहुप्रतिक्षित गाणं प्रदर्शित केलं आहे.

पाहा गाणं Watch the Song : Seeti Maar

सलमानच्या आयकॉनिक गाण्यांचा ट्रॅक रेकॉर्ड कायम

प्रत्येक चित्रपटात सलमानच्या आयकॉनिक गाण्यांचा ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता, ‘सिटी मार’ सुरुवातीपासूनच या वर्षीचा सर्वात मोठा चार्टबस्टर बनणार याची चर्चा होती. या गाण्याला कमाल खान आणि लुलिया वंतूर यांनी गायलं असून शब्बीर अहमद यांनी हे गाणं लिहिलं आहे. हा ट्रॅक म्यूजिक रॉकस्टार आणि संगीतकार देवी श्री प्रसाद (डीएसपी) यांनी कंपोज केला आहे त्यांनीच यापूर्वी सलमानसाठी सेंसेशनल हिट ‘ढिंका चिका’ हा ट्रॅक तयार केला होता.

सलमान खानची सिग्नेचर डान्स स्टाइल आणि हॉट अभिनेत्री दिशा पाटनीची खास अदा

सलमान खानची सिग्नेचर डान्स स्टाइल सोबतच हॉट आणि सुंदर अभिनेत्री दिशा पटानी प्रभुदेवाच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्यात प्रेक्षकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावणारे सर्व गुण आहेत. जानी मास्टर आणि प्रभुदेवानं हिप-हॉपसोबतच क्लासिक साउथ स्टाईल कोरियोग्राफीचं उत्तम मिश्रण सादर केलं आहे. सोबतच, सलमान आणि दिशा दोघांनीही आपल्या सेंसेशनल केमिस्ट्री आणि उत्तम डान्स मूव्सनं सुंदर सादरीकरण केलं आहे. हे गाण बघताना तुम्हीही एका जागेवर बसू शकणार नाही हे नक्की.

‘सिटी मार’ची हुक स्टेप वेधतेय सर्वांचं लक्ष

‘सिटी मार’ची हुक स्टेप सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी पुरेशी ठरतेय आणि सलमान खानची ही हुक स्टेप प्रचंड व्हायरलदेखील होत आहे. ट्रेलर आणि गाणे पाहिल्यानंतर, या वर्षी ईदला प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे हे नक्की आहे.

सलमान खानची इन्स्टाग्राम पोस्ट

संबंधित बातम्या

Photo : मालदीव व्हेकेशन इज ओव्हर, दिशा पाटनी आणि टायगर मुंबईत परतले

Photo : रकुलप्रीत सिंहचा लेडी बॉस अवतार, तुम्हीही करू शकता ट्राय

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.