‘मी तुझ्याकडे भीक मागतो, माझ्या मुलाला…’, शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यातील चॅट समोर

समीर वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत शाहरुख खान सोबत झालेल्या संभाषणाचे प्रत जोडले आहेत. यामध्ये शाहरुख खान समीर वानखेडे यांच्याकडे आपल्या मुलासाठी अक्षरश: याचना करत होता, असं दिसतंय.

'मी तुझ्याकडे भीक मागतो, माझ्या मुलाला...', शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यातील चॅट समोर
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 4:53 PM

मुंबई : एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे हे सध्या अडचणीत सापडले आहेत. त्यांनी आर्यन खान प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याच्याकडे 25 कोटींची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत कारवाईला सुरुवात केली आहे. सीबीआयने वानखेडे यांच्या घरावर छापा टाकल्याची देखील माहिती समोर आलेली. सीबीआयने समीर वानखेडे यांना चौकशीसाठी समन्सही बजावलं होतं. पण समीर वानखेडे यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतलेली. विशेष म्हणजे दिल्ली हायकोर्टाने त्यांना दिलासा देत मुंबई हायकोर्टात दाद मागण्याचे निर्देश दिले.

या सगळ्या घडामोडींनंतर समीर वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात रिट याचिका दाखल केलीय. या याचिकेत एक मोठा खुलासा झालाय. आर्यन खान याच्या अटकेनंतर समीर वानखेडे आणि शाहरुख खान सातत्याने संपर्कात होते. त्यांच्यातील संभाषण आता समोर आलं आहे. या संभाषणात शाहरुख खानने मुलाला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांच्याकडे विनंती केल्याचं समोर आलं आहे.

“मुलाचं आयुष्य बरबाद होऊ देऊ नका. तुम्हाला जेवढं काही करता येईल तेवढं करा. मी कुणाकडेही मदत मागितलेली नाही. माझी ताकद कुठेही वापरलेली नाही. माझं कुठलंही स्टेटमेंट दिलेलं नाही. त्यामुळे तुमच्यातील माणुसकीच्या नात्याने जे काही करता येईल ते करा आणि त्याला लवकरात लवकर घरी कसं येता येईल, त्यासाठी प्रयत्न करा”, अशी विनंती शाहरुख खानकडून समीर वानखेडे यांच्याकडे केली जात होती.

हे सुद्धा वाचा

या संभाषणात एक गोष्ट समोर येतेय, दोन्ही बाजूने सकारात्मक पद्धतीने संभाषण सुरु होतं. त्यामध्ये कुठल्याही पद्धतीने खंडणीची मागणी करण्यात आलेली नाही. पैशांच्या व्यवहाराबद्दल संभाषण झालेलं नव्हतं. हे सर्व संभाषण समीर वानखेडे यांनी आपल्या याचिकेत जोडलं आहे.

संभाषणात नेमकं काय म्हटलंय?

शाहरुख खान : कृपया मला कॉल कर. आर्यन खानचा वडील म्हणून मी तुझ्याशी बोलेन, तू चांगला माणूस आहे आणि एक चांगला पतीदेखील आहेस आणि मी सुद्धा. कायद्यामध्ये राहून माझ्या कुटुंबासाठी मी तुझ्याकडे मदत मागत आहे. मी तुझ्याकडे भीक मागतो, माझ्या मुलाला जेलमध्ये जाऊ देऊ नको.

शाहरुख खान : जेलमध्ये गेल्यानं माणूस खचून जातो. तू मला प्रोमिस केलं आहे, माझ्या मुलाला बदलून टाकशील. माझ्या आणि माझ्या परिवारावर दया कर. माझ्या मुलाला घरी पाठव, मी तुझ्याकडे एक वडील म्हणून भीक मागतो.

समीर वानखेडे : शाहरुख खान मी तुला चांगला माणूस म्हणून ओळखतो. जे होईल ते चांगलं होईल. तू कुझी काळजी घे.

समीर वानखेडे यांची मालमत्ता रडावर

संबंधित प्रकरणामुळे समीर वानखेडे यांची मालमत्ता रडावर आली आहे. वानखेडे यांचे मुंबईत 5 फ्लॅट आहेत. समीर वानखेडेंनी गोरेगावमध्ये पाचवा फ्लॅट खरेदी केलाय. वानखेडेंनी वाशिममध्ये सव्वाचार एकर जमीन खरेगी केल्याचं चौकशीतून समोर आलंय. समीर वानखेडे यांची वार्षिक कमाई ही 31 लाख 56 हजार आहे. तर त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांची वार्षिक कमाई ही जवळपास 14 लाख इतकी आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.