बिकिनीमुळे वादात अडकलेला ‘पठाण’ आता ओटीटीवर, ‘या’ महिन्यात होणार प्रदर्शित
अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या 'बेशर्म रंग' गाण्यातील बिकिनीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'पठाण' चित्रपट मोठ्या पडद्यावरच नाही, तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील होणार प्रदर्शित
Shah Rukh Khan Pathaan Release On OTT : अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan ) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (deepika padukone ) स्टारर ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटामुळे वातावरण तापलेलं आसताना चित्रपटाबद्दल एक मोठी माहिती समोर येत आहे. दीपिका पादुकोणच्या ‘बेशर्म रंग’ गाण्यातील बिकिनीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘पठाण’ चित्रपटाच्या विरोधात अनेक राजकारणी आणि संघटनांनी आक्षेप घेतला, तर दुसरीकडे अनेक बॉलिवूडकरांनी होणाऱ्या वादाला विरोध केला. चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ गाण्यानंतर ‘झूमे जो पठाण’ गाणं देखील प्रदर्शित करण्यात आलं आहे. आता प्रेक्षक चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत.
‘पठाण’ सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित ‘पठाण’ चित्रपट 25 जानेवारी 2023 मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. एवढंच नाही तर चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगत आहे. चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आशी चर्चा रंगत आहे. पण याबद्दल चित्रपटाच्या मेकर्सकडून कोणतही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Pathaan Release On OTT)
शाहरुख आणि दीपिका स्टारर ‘पठाण’ सिनेमा 2023 मध्ये मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहे. चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणाऱ्या ‘पठाण’ सिनेमाचे डीजिटल राईट्स 200 कोटी रुपयांमध्ये रिर्झव्ह करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे.
ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक चित्रपटाच्या प्रतीक्षेत ‘पठाण’ ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण शिवाय अभिनेता जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पठाण चित्रपट फक्त हिंदी भाषेत प्रदर्शित होणार नसून तमिळ आणि तेलुगू भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आहेत, तर निर्माते आदित्या चोप्रा आहेत.
4 वर्षांनंतर किंग खान येणार चाहत्यांच्या भेटीस अभिनेता शाहरुख खान गेल्या 4 वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. ‘झिरो’ चित्रपटानंतर तब्बल 4 वर्षांनी शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. म्हणून ‘झिरो’ चित्रपटाच्या अपयशानंतर अभिनेत्याचा ‘पठाण’ चित्रपट किती रुपयांचा गल्ला जमा करणार… हे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच कळेल. सध्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत. (shahrukh khan new film)