Video | अमेरिकेच्या नेव्ही बँडने गायले ‘स्वदेस’ चित्रपटाचे गाणे, भावूक झालेल्या शाहरुखने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया!

शाहरुखच्या 'स्वदेश' या चित्रपटातील प्रसिद्ध गाणे 'ये जो देश है तेरा'वर (Yeh Jo Desh Hai Tera) या बँडने आपले सादरीकरण केल. यूएस नेव्ही बँडची हे सदरीकरण सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.

Video | अमेरिकेच्या नेव्ही बँडने गायले ‘स्वदेस’ चित्रपटाचे गाणे, भावूक झालेल्या शाहरुखने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया!
शाहरुख खान झाला भावूक
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 2:02 PM

मुंबई : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘स्वदेस’  (Swades) या चित्रपटाला भारतीय लोकांच्या हृदयात एक खास स्थान आहे. या चित्रपटाद्वारे देशभक्तीची भावना प्रेक्षकांसमोर अतिशय अनोख्या पद्धतीने सादर केली गेली. या चित्रपटाविषयी आणि त्यातील गाण्यांबद्दल आजही तितकीच क्रेझ आहे, हे केवळ भारतातच नाही तर परदेशातही नुकतेच पाहिले गेले. खरं तर, अमेरिकेच्या नेव्ही बँड ‘सी चांटर्स’ने अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजित सिंग संधू (Taranjit Singh Sandhu) यांच्या समोर एक छोटासा परफॉर्मेंस सादर केला (Shah Rukh Khan emotional reaction on US navy band performance on Yeh Jo Desh Hai Tera song).

शाहरुखच्या ‘स्वदेश’ या चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘ये जो देश है तेरा’वर (Yeh Jo Desh Hai Tera) या बँडने आपले सादरीकरण केल. यूएस नेव्ही बँडची हे सदरीकरण सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. खुद्द शाहरुख खानदेखील यावर प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. शाहरुख या सादरीकरणावर प्रतिक्रिया देताना थोडास भावूक झालेला दिसला. तरनजितसिंग संधू यांनी आपल्या ट्विटर हँडलवर यूएस नेव्ही बँडचे हे सादरीकरण शेअर केले आहे.

पाहा शाहरुख खानचे ट्विट

तरनजितसिंग संधू यांच्या ट्विटला उत्तर देताना शाहरुखने लिहिले की, ‘हे शेअर केल्याबद्दल धन्यवाद सर. हे खूप गोड आहे. जेव्हा हा चित्रपट आणि हे गाणे ऐकू येते तेव्हा, जुन्या काळाची आठवण येते.’ एवढेच नाही तर शाहरुखने या चित्रपटाशी आणि गाण्याशी संबंधित सर्व कलाकारांचेही आभार मानले आहेत (Shah Rukh Khan emotional reaction on US navy band performance on Yeh Jo Desh Hai Tera song).

पाहा हा व्हिडीओ

हा व्हिडीओ शेअर करताना तरनजित यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘हे बंधन आहे जे कधीही तुटू शकत नाही. हे मैत्रीचे बंधन आहे जे कधीही तुटू शकत नाही…’

सादरीकरणाचे निमित्त…

भारत आणि अमेरिका यांच्यातील दृढ संबंधांना आणखी बळकट करण्याकरता यूएस नेव्हीच्या मुख्यालयात रात्रीच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी हे गाणे यूएस नेव्ही बँडने सादर केले. त्याचबरोबर जर, आपण स्वदेश चित्रपटाच्या या गाण्याबद्दल बोललो, तर हे मूळ गाणे ए.आर. रहमान यांनी गायले होते. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेश’ हा चित्रपट 2004मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री गायत्री जोशी झळकली होती. तथापि, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास जादू दाखवू शकला नव्हता. परंतु, त्याची संकल्पना प्रेक्षकांना खूप भावली.

(Shah Rukh Khan emotional reaction on US navy band performance on Yeh Jo Desh Hai Tera song)

हेही वाचा :

VIDEO : प्रत्येक भारतीयाच्या अंगावर शहारे येतील; अमेरिकन नौदलाच्या जवानांनी गायलं ‘ये जो देस है तेरा’

Akshay Kumar | अक्षय कुमारने सुरु केले ‘राम सेतु’चे चित्रीकरण, लूकविषयी सांगताना म्हणाला…

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.