आर्यनला घरातही ‘शर्टलेस’ फिरण्यावर बंदी! शाहरुख खानने सांगितले कारण…

बॉलिवूडचा रोमान्स किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्यांच्या रोमँटिक शैलीमुळे आजही तो लाखो मुलींचा क्रश आहे. चित्रपटांप्रमाणेच तो खऱ्या आयुष्यातही स्त्रियांचा खूप आदरही करतो.

आर्यनला घरातही ‘शर्टलेस’ फिरण्यावर बंदी! शाहरुख खानने सांगितले कारण...
आर्यन आणि शाहरुख खान
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 2:57 PM

मुंबई : बॉलिवूडचा रोमान्स किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्यांच्या रोमँटिक शैलीमुळे आजही तो लाखो मुलींचा क्रश आहे. चित्रपटांप्रमाणेच तो खऱ्या आयुष्यातही स्त्रियांचा खूप आदरही करतो. त्याचा असा विश्वास आहे की, स्त्रीयांसमोर पुरुषांनी शर्ट न घालता फिरू नये. आपल्या कुटुंबात किंवा मित्रांमध्ये ‘शर्टलेस’ होऊन फिरू नये. हीच शिकवण त्याने आपल्या मुलाला अर्थात आर्यनलाही दिली आहे (Shah Rukh Khan restricted Aryan khan from being shirtless in home).

शाहरुख खानने 2017मध्ये फेमिनाशी बोलताना सांगितले की, मला नेहमीच असे वाटते की, आपल्या घरात आई, बहीण किंवा मित्रपरिवारासमोर शर्टलेस फिरण्याचा अधिकार कोणालाही नाही. मी देखील आर्यनला नेहमीच पूर्ण वेळ टी-शर्ट घालायला सांगतो.

शाहरुख म्हणाला की, ‘जर आपल्याला आपली आई, मुलगी, बहीण किंवा कोणतीही मैत्रीण यांना कमी कपड्यांत पाहणे आपल्याला विचित्र वाटत असेल, तर त्यांच्यासमोर शर्टलेस फिरताना त्यांनी आपल्यला सहन करावे अशी अपेक्षा आपण कशी करू शकता? स्त्रियांसमोर अतिशय सभ्यपणे वागले पाहिजे.

भाषा नीट वापरा, शाहरुखचा सल्ला!

ट्विटर सत्रादरम्यान शाहरुख खानला एका वापरकर्त्याने विचारले की, तुमच्या मनात स्त्रियांबद्दल इतका आदर कसा आहे? जेव्हा एका वापरकर्त्याने त्याला मुलीला कसे पटवावे याच्या टिप्स विचारल्या, तेव्हा या प्रश्नावर उत्तर देताना शाहरुखने त्याला अशा शब्दांचा वापर टाळण्याचा सल्ला दिला होता. तो म्हणाला, ‘सर्वप्रथम मुलींना पटवणे वैगरे यासारखे शब्द वापरणे थांबवा. नेहमीच आदर आणि सभ्यतेने बोलण्याचा प्रयत्न करा.’(Shah Rukh Khan restricted Aryan khan from being shirtless in home

‘पठाण’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

‘किंग’ शाहरुख खानला आर्यन, अबराम आणि सुहाना अशी तीन मुले आहेत. 1991 मध्ये त्याने पेशाने डिझाईनर असणाऱ्या गौरीशी लग्न गाठ बांधली. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुख खान शेवट आनंद एल रॉय यांचा चित्रपट ‘झिरो’मध्ये दिसला होता. या चित्रपटात शाहरुखसोबत अभिनेत्री कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा दिसल्या होत्या. त्यानंतर शाहरूख कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. ‘पठाण’ या चित्रपटाद्वारे तो लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शाहरुख सध्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पुढील वर्षी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

(Shah Rukh Khan restricted Aryan khan from being shirtless in home)

हेही वाचा :

Photo : शाहरुख खानचे ‘हमशकल’ माहितीयत? शाहरुख बनतात, डमी काम करतात

Photo : दिव्यांका त्रिपाठीची केपटाऊनमध्ये धमाल, शो जिंकण्यासाठी करावी लागणार कमाल

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.