मुंबई : बाॅक्स ऑफिसवर शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पठाण हा चित्रपट धमाका करत आहे. इतकेच नाहीतर थिएटरमध्ये चित्रपट बघायला गेलेले चाहते हे चित्रपटातील गाणे सुरू होताच डान्स करताना दिसत आहेत. पठाण (Pathaan) चित्रपट बाॅक्स ऑफिसवर जादू करत असतानाच दुसरीकडे पठाण चित्रपट बघण्यास आलेल्या चाहत्यांच्या उत्साहामुळे थिएटर मालकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. सोशल मीडियावर काही व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, काही उत्साही चाहते पठाण चित्रपट थिएटरमध्ये सुरू असताना चक्क फटाके थिएटरमध्ये फोडत आहेत. इतकेच नाहीतर थिएटरमधील खुर्च्यांवर उभे राहून चाहते डान्स करत असल्याने थिएटरमधील खुर्च्यांची तोडफोड होत आहे. पठाण चित्रपटामुळे बाॅलिवूडला (Bollywood) मोठा दिलासा नक्कीच मिळाला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट सातत्याने बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जात होते. पठाण चित्रपट धमाकेदार कलेक्शन करत अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर नोंदवत आहे.
विशेष म्हणजे पठाण या चित्रपटाने २०२२ मधील ब्लॉकबस्टर ठरलेल्या चित्रपटांचे रेकाॅर्ड तोडले आहे. आता पठाण हा चित्रपट चार दिवसांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा बाॅलिवूडचा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे.
पठाण या चित्रपटाने बाहुबली २, केजीएफ २ आणि आरआरआर या चित्रपटांना देखील मागे टाकले आहे. आता पठाण हा चित्रपट सर्वाधिक हिंदीमध्ये कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. भारतामधील सर्व भाषांमध्ये मिळून पठाण चित्रपटाने चार दिवसांमध्ये २१४.५ कोटींचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन केले.
२५ फेब्रुवारी २०२२ ला गंगूबाई काठियावाड़ी हा आलिया भट्ट हिचा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाचे चार दिवसांचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन हे ४७,२३ कोटी होते.
द कश्मीर फाईल हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते. या चित्रपटाने चार दिवसांमध्ये ४२.२ कोटींचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन केले होते.
आरआरआर या साऊथच्या चित्रपटाने देखील मोठा धमाका केला होता. हा चित्रपट मार्च २०२२ मध्येच रिलीज झाला होता. आरआरआर चित्रपटाने देखील चार दिवसांमध्ये ४८.८० कोटींचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन केले होते.
केजीएफ २ हा चित्रपट देखील मार्च २०२२ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने देखील अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. केजीएफ २ ने देखील चार दिवसांमध्ये ५०.३५ कोटींचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन केले होते.
२०२२ मध्ये हीट ठरलेल्या या चित्रपटांना बाॅक्स ऑफिसच्या चाैथ्या दिवशीच्या कमाईमध्ये पठाण चित्रपटाने मागे टाकले असून चार दिवसांमध्ये पठाण या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर २१४.५ कोटींचे कमाई केलीये.