Pathaan | शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने तोडला मोठा रेकाॅर्ड, आमिर खान आणि सलमान खान यांच्या चित्रपटाला…

| Updated on: Feb 16, 2023 | 4:32 PM

पठाण या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बाॅक्स ऑफिसवर तब्बल 100 कोटींचे कलेक्शन जगभरातून केले. पठाण या चित्रपटातून शाहरुख खान याने दाखवून दिले की, उगाच आपल्याला बाॅलिवूडचा किंग म्हटले जात नाही.

Pathaan | शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने तोडला मोठा रेकाॅर्ड, आमिर खान आणि सलमान खान यांच्या चित्रपटाला...
Follow us on

मुंबई : शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर हीट ठरला आहे. पठाण (Pathaan) हा शाहरुख खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट होता. कारण 2019 मध्ये शेवटी शाहरुख खान हा झिरो या चित्रपटामध्ये दिसला होता. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप गेला. शाहरुख खान हा झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर मोठ्या पडद्यापासून दूर गेला. शाहरुख खान हा परत बाॅलिवूड (Bollywood) चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार की नाही? हा मोठा प्रश्न त्याच्या चाहत्यांसमोर उभा होता. शेवटी तो 25 जानेवारीचा दिवस आला आणि शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून दणदणीत असे पुनरागमन केले. पठाण या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बाॅक्स ऑफिसवर तब्बल 100 कोटींचे कलेक्शन जगभरातून केले. पठाण या चित्रपटातून शाहरुख खान याने दाखवून दिले की, उगाच आपल्याला बाॅलिवूडचा किंग म्हटले जात नाही.

ओपनिंग डे पासूनच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर नोंदवत आहे. शाहरुख खान याच्या करिअरमधील पठाण हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता पठाण या चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल 22 दिवस झाले असून अजूनही बाॅक्स ऑफिसवर पठाणचा जलवा बघायला मिळतोय.

विशेष म्हणजे आता पठाण हा चित्रपट बाॅलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 22 दिवसांमध्ये चित्रपटाने 500 कोटींचा कमाईचा आकडा पार केला आहे. अजूनही पठाण चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळते. व्हॅलेंटाईन डे दिवशी चित्रपटाने जबरदस्त कामगिरी बाॅक्स ऑफिसवर केलीये.

सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट पठाण ठरला आहे. पठाण 502 कोटी, दंगल 387.38 कोटी, संजू 342.86 कोटी, पीके 340.80 कोटी, टाइगर जिंदा है 339.16 कोटी, बजरंगी भाईजान 320.34 कोटी, वॉर 318 कोटी. म्हणजेच आता पठाण या चित्रपटाने एक मोठा रेकाॅर्ड आपल्या नावावर नोंदवला आहे.

पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. चित्रपटातील बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातली होती. यामुळे वाद निर्माण झाला होता. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने केली जात होती. मात्र, या वादाचा फायदा प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर झाला.