मुंबई : असे म्हटले जाते, बिग बाॅसचे घर हे बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी असलेला मोठा दरवाजा आहे. कारण बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यानंतर अनेकांना थेट चित्रपटांमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळालीये. बिग बाॅसच्या घरात सहभागी झाल्यावर चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ होते आणि लोकप्रियता वाढते. बिग बाॅस १६ चेच आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की, अब्दु रोजिक याचा चाहता वर्ग मोठा होता. परंतू बिग बाॅसमध्ये सहभागी होताच अब्दु हा भारतामधील प्रत्येक घरापर्यंत पोहचला आहे. बिग बाॅसच्या घरात आल्यावर प्रत्येकाला एक खास ओळख नक्कीच मिळते.
बरेचजण असे आहेत, ज्यांना बाॅलिवूडमध्ये पदार्पण करायचे असते. यासाठी ते बिग बाॅसच्या घरात सहभागी होतात. आतापर्यंत बिग बाॅसमध्ये सहभागी झालेल्या अनेकांना बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम मिळाले आहे. यापैकीच एक नाव म्हणजे शहनाज गिल हे देखील आहे.
बिग बाॅसच्या घरात सहभागी होण्याच्या अगोदर शहनाज गिल हिला फक्त पंजाबमध्ये ओळखले जायचे. परंतू बिग बाॅसच्या घरात सहभागी झाल्यापासून शहनाज खूप जास्त फेमस झालीये. तिची आणि सिद्धार्थ शुक्लाची जोडी सर्वांनाच आवडली होती.
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर चाहत्यांनी शहनाज गिलवर खास प्रेम केले. शहनाज लवकरच एका बाॅलिवूड चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये सलमान खान हा मुख्य भूमिकेत असणार आहे.
गुरु रंधावा आणि शहनाज गिल यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच गुरु रंधावा याने शहनाज गिलसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून लिहिले आहे, लोक म्हणतात की, आम्ही दोघेसोबत खूप क्यूट दिसतो…खरोखरच हे सत्य आहे का?
गुरु रंधावा याच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. अनेकदा गुरु रंधावा आणि शहनाज गिल हे सोबत स्पाॅट होतात. या दोघांनी काही गाणे देखील सोबत केले आहेत. आता गुरु रंधावा याची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.