Video | महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागला अन् शिल्पा शेट्टीने नवऱ्याच्या हातात झाडू दिला! पाहा धमाल व्हिडीओ…

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) यांनी सोशल मीडियावर एक धमाल व्हिडीओ पुन्हा शेअर केला आहे.

Video | महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागला अन् शिल्पा शेट्टीने नवऱ्याच्या हातात झाडू दिला! पाहा धमाल व्हिडीओ...
शिल्पा शेट्टी
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 2:55 PM

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेल्या वर्षी याच महिन्यात पूर्णपणे लॉकडाऊन (Lockdown) लागला होता. तेव्हा सेलिब्रिटी काय नि सामान्य लोक काय, सर्वचजण स्वत: घरकाम करताना दिसले होते. आता पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोक वर काढलं आहे, महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन तर, काही शहरांमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दरम्यान कलाकारांनी पुन्हा एकदा इंटरनेटवर धमाल करायला सुरुवात केली आहे (Shilpa Shetty Husband Raj Kundra share funny video on lockdown).

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) यांनी सोशल मीडियावर एक धमाल व्हिडीओ पुन्हा शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लॉकडाउन पुन्हा सुरू होत आहे, पुन्हा घरी काम करण्यास सुरुवात होत आहे. देवा आम्हाला मदत कर. लक्षात ठेवा पत्नी नेहमीच बरोबर असते.’

काय आहे व्हिडीओमध्ये?

राज कुंद्राने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी सफाई करताना दिसत आहे, तर राज कुंद्रा आरामदायक खुर्चीवर बसून फोनमध्ये टाईमपास करत आहे. मग, वैतागलेली शिल्पा त्याला म्हणते की, ‘ऐ जानू चल झाड़ू मार.’ मग त्यावर राज कुंद्रा म्हणतात, ‘मैं नहीं मारूंगा’. पुन्हा शिल्पा पुढे म्हणते की, ‘ आखिरी बार बोल रही हूं झाड़ू मार.’  मग राज कुंद्राही गप्प हातात झाडू घेतात आणि म्हणतात की, ‘ठीक है तुम कहती हो तो मैं ये कर रहा हूं’ आणि मग त्यांनी झाडूने मजेदार पद्धतीने शिल्पाला फटके मारण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ पाहताना चाहते देखील पोट धरून हसत आहेत (Shilpa Shetty Husband Raj Kundra share funny video on lockdown).

पाहा धमाल व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Raj Kundra (@rajkundra9)

हा व्हिडीओ एकवर्षापूर्वीचा आहे. मात्र, महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने त्यांनी एक मजेशीर कॅप्शन लिहित हा व्हिडीओ पुन्हा एकदा शेअर करत चाहत्यांना हसवले आहे.

चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

चाहते या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले- ‘तुम्ही दोघेही मनोरंजन करण्यात मागे नाहीत.’ त्याचवेळी एका वापरकर्त्याने विचारले की, ‘तुमच्यापैकी घरात कोणाची मर्जी चालते?’ तर, दुसर्‍या एकाने लिहिले की, ‘गुड वन’

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सध्या ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ मध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे. याशिवाय काही काळापूर्वी तिने ‘हंगामा 2’ आणि ‘निकम्मा’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. शिल्पा या चित्रपटांद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे.

(Shilpa Shetty Husband Raj Kundra share funny video on lockdown)

हेही वाचा :

PHOTO | अभिनेता विकी कौशलही कोरोना पॉझिटिव्ह, बॉलिवूडचे ‘हे’ कलाकारही कोरोनाच्या विळख्यात

भाऊ शौविकसह रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा NCB ऑफिसमध्ये दाखल, वाचा नेमकं काय झालं…

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.