Shravan Rathod | कोरोनाची लागण होण्यापूर्वी पत्नीसमवेत कुंभमेळ्यात सामील झाले होते श्रवण राठोड!
कोरोना पॉझिटिव्ह होण्यापूर्वी संगीतकार श्रवण पत्नीसमवेत कुंभमेळ्यात (Kumbha Mela) गेले होते. याबद्दल माहिती देताना ते म्हणाले, 'कोरोनाची काही लक्षणे दिसल्यानंतर पप्पांना गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापूर्वी नुकतेच ते कुंभमेळ्यातून परतले होते.’
मुंबई : संगीतकार श्रवण राठोड (Shravan Rathod) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. श्रवण यांच्या निधनानंतर आता त्यांचा मुलगा संजीव यांनी अशी काही माहिती दिली आहे की, ज्यामुळे सर्वचजण थक्क झाले आहेत. त्यांच्या मुलाने सांगितले की, कोरोना पॉझिटिव्ह होण्यापूर्वी संगीतकार श्रवण पत्नीसमवेत कुंभमेळ्यात (Kumbha Mela) गेले होते. याबद्दल माहिती देताना ते म्हणाले, ‘कोरोनाची काही लक्षणे दिसल्यानंतर पप्पांना गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापूर्वी नुकतेच ते कुंभमेळ्यातून परतले होते.’(Shravan rathod visited Kumbha mela before tested corona positive son revels)
संजीव राठोड म्हणाले की, ‘कुंभमेळ्यातून परत आल्यानंतर त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता.’ संजीव म्हणाले, ‘आमच्या कुटुंबाला इतका त्रास सहन करावा लागेल असे आम्हाला कधी वाटले नव्हते. माझ्या वडिलांचे निधन झाले, मी आणि माझी आई कोरोना पॉझिटिव्ह आहोत, माझा भाऊही देखील कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि तो घरीच अलगीकरणात आहे. परंतु, वडिलांच्या मृत्यूमुळे त्याला वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्यात आली आहे.’
मृतदेह देण्यास रुग्णालयाकडून विलंब?
श्रवण यांचा मृतदेह रुग्णालयाने कुटुंबीयांना दिला नसल्याची माहिती मिळात होती. श्रवणच्या कुटुंबीयांना रुग्णालयाने प्रथम दहा लाख रुपयांचे बिल देण्यास सांगितले होते, असेही म्हटले जात होते. या वृत्तावर संजीव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या अहवालांना ‘अफवा’ म्हटले आहे. संजीव म्हणाले, ‘रुग्णालय माझ्या वडिलांचा मृतदेह आम्हाला देत नाही, या सर्व अफवा अशी आहेत. रुग्णालय खूपच चांगले आहे आणि त्यांनी माझ्या वडिलांसाठी शक्य तितके सगळे प्रयत्न केले.’ संजीव पुढे म्हणाले की, ‘माझा भाऊ रुग्णालयात निघाला आहे, बीएमसी रुग्णवाहिका त्याला मदत करत आहे, कारण तो देखील कोरोना पॉझिटिव्ह आहे.'(Shravan rathod visited Kumbha mela before tested corona positive son revels)
अनेक आजारांनी ग्रस्त
श्रवण राठोड यांच्यावर कोरोना उपचार करणार्या डॉक्टरांनी सांगितले होते की, ते इतर विविध आजारांनीही ग्रस्त होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता निर्माण झाली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर 66 वर्षीय संगीतकार असलेल्या श्रवण राठोड यांना माहीमच्या एसएल रहेजा रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवले होते. शेवटच्या दिवसांत ते व्हेंटिलेटरवर होते. श्रवण हे मधुमेहग्रस्त होते आणि त्यातच त्यांच्या फुफ्फुसांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे हृदयाची गती मंदावली होती. तसेच अनेक आजारांनाही डोकं वर काढलं होतं. त्यांच्यावर मुंबईतील माहीममधील रुग्णालयात उपचारही सुरू होते, परंतु उपचारादरम्यान आज त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचं निधन झालं.
(Shravan rathod visited Kumbha mela before tested corona positive son revels)
हेही वाचा :
‘नदीम-श्रवण’ फेम श्रवण राठोड कालवश, दहा लाखांचे बिल थकल्याने पार्थिव मिळण्यास विलंब
‘तुझ्या पप्पांना काही होऊ देणार नाही, 1 तासात व्हेंटिलेटर मिळेल’, सोनू सूद पुन्हा मदतीला धावला
Nadeem- Shravan Hits | नदीम-श्रवण यांची सुपरहिट गाणी, ज्यांनी वाढवली लाखो हृदयांची ‘धडकन’#NadeemShravan | #ShravanRathod | #Bollywood | #NadeemShravanSuperHitshttps://t.co/PbjHboELoN
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 23, 2021