Bollywood Corona | कलाकारांच्या मागे कोरोनाचे शुक्लकाष्ट, आदित्य नारायण-श्वेतालाही कोरोनाची लागण!
आदित्यने पत्नीसह एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. आदित्यने त्यांच्या हनीमूनदरम्यानचा श्वेतासोबतचा जुना फोटो शेअर केला आहे
मुंबई : मुंबईत कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. बरेच सेलेब्रिटीही या विषाणूच्या संसर्गाला बळी पडत आहेत. गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि त्याची पत्नी श्वेतासुद्धा (Shweta Agarwal) या यादीमध्ये सामील झाले आहेत. आदित्यने पत्नीसह एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. आदित्यने त्यांच्या हनीमूनदरम्यानचा श्वेतासोबतचा जुना फोटो शेअर केला आहे (Singer Aditya Narayan and Shweta agarwal tested corona positive).
फोटो शेअर करण्याबरोबरच आदित्यने लिहिले की, ‘सर्वांना नमस्कार, माझा आणि माझी पत्नी श्वेता अग्रवाल हिचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. आम्ही दोघे क्वारंटाईन झाले आहोत. कृपया काळजी घ्या आणि सुरक्षित रहा आणि आमच्यासाठी प्रार्थना करा.’
आदित्यच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलेब्रिटीसुद्धा कमेंट करून, त्यांना लवकर बरे वाटावे म्हणून शुभेच्छा देत आहेत. गायिका नेहा कक्कर हिने देखील आदित्यच्या पोस्टवर कमेंट केली आहे.
पाहा आदित्यची पोस्ट
View this post on Instagram
शोचे शूटिंग थांबवले
आदित्य कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर तो होस्ट करत असलेल्या ‘इंडियन आयडॉल 12’ या शोचे शूटिंग तत्काळ थांबवण्यात आले आहे. आता टीममधील सर्व सदस्यांची कोव्हिड टेस्ट होणार आहे. तोपर्यंत शोचे सर्व जज आणि उर्वरित टीम मेंबर यांना अलगीकरणात ठेवण्यात येणार आहे (Singer Aditya Narayan and Shweta agarwal tested corona positive).
विशाल दादलानीने घेतली कोरोना लस
या शोचे परीक्षक विशाल दादलानी यांनी 1 एप्रिल रोजी कोरोन लस घेतली होती. याबाबत सोशल मीडियावर त्यांनी एक अपडेट देखील केली होती. विशालने शुक्रवारी ट्विट केले की, ‘काल मला कोव्हिड लसीचा पहिला डोस मिळाला. लीलावती रुग्णालयात सुयोग्य समायोजन केले आहे. अद्याप या लसीचा काही दुष्परिणाम झालेला नाही. लसीचे इंजेक्शन टोचल्यामुळे खांद्यावर थोडीशी वेदना होते आहे.’
टीव्ही कलाकारांना कोरोनाची लागण
टीव्ही कलाकारांबद्दल बोलायचे झाल्यास, नुकतेच कलर्सच्या मोलक्की सीरियलमधील मुख्य कलाकार तोरल रसपुत्र, अमर उपाध्याय, प्रियाल महाजन, तसेच भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा, अभिनेता अंकित सिवाच आणि तारक मेहता फेम मंदार चांदवडकर या कलाकारांनीही कोरोनाची लागण झाली आहे.
या व्यतिरिक्त डान्स शो ‘डान्स दिवाने 3’ च्या सेटवर तब्बल 18 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, त्यानंतर सेटवर विशेष खबरदारी घेतली जात आहे. या शोची परीक्षक अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने स्वतःची कोव्हिड टेस्ट देखील केली होती, ज्यात तिचा अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु, सेटवर बरेच लोक कोव्हिड पॉझिटिव्ह झाल्यानंतर माधुरीने शोमधून ब्रेक घेतला आणि ती फॅमिलीसमवेत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदीवला रवाना झाली आहे.
(Singer Aditya Narayan and Shweta agarwal tested corona positive)
हेही वाचा :
PHOTO | सिल्व्हर शिमरी ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा जलवा, फोटो पाहून चाहते म्हणाले ‘हाय गर्मी..’