आधी नोकराला मारहाण आता स्पष्टीकरण; गायक Rahat Fateh Ali Khan म्हणाले…
Singer Rahat Fateh Ali Khan beating To servant Viral Video : गायक राहत फतेह अली खान यांच्याकडून नोकराना जबर मारहाण... मारहाणीचा व्हीडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल. सोशल मीडियावर चर्चाच चर्चा. नेमकं काय घडलं? प्रसिद्ध गायकांनी नोकराला का मारलं? वाचा सविस्तर...
मुंबई | 28 जानेवारी 2024 : प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांच्याबाबतची एक थक्क करणारी बातमी समोर आली आहे. एक व्हीडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहेय. राहत फतेह अली खान हे नोकराला चपलेने मारहाण करताना या व्हीडिओमध्ये दिसत आहेत. या व्हीडिओत राहत फतेह अली खान नोकराला एकच प्रश्न वारंवार विचारताना दिसत आहेत. टेबलावर ठेवलेली दारूची बाटली कुठे गेली? असं ते नोकराला विचारत आहेत. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पाकिस्तानसह भारतात या व्हीडिओची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यानंतर राहत यांनी आता स्पष्टीकरणही दिलं आहे.
Famous singer Rahat Fateh Ali khan beating his servent for bottle of Alcohol pic.twitter.com/9DZwYxgPmV
— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) January 27, 2024
गायकाकडून नोकराला मारहाण
एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान नोकराला मारहाण करत आहेत. आधी त्यांनी नोकराचे केस पकडले. त्यानंतर चपलेने त्यांनी नोकराला जबर मारहाण केली. चपलेने त्यांनी नोकराच्या डोक्यात मारलं. यावेळी नोकर घाबरल्याचं दिसलं. तो घाबरून लांब- लांब जाऊ लागला. पण मग राहत फतेह अली खान त्याच्या जवळ जातात. पुन्हा त्याला विचारतात की, टेबलावरची दारूची बॉटल कुठे गेली?
केसाला पकडत मारहाण
राहत फतेह अली खान यांनी प्रश्न विचारल्यावर नोकर शांत राहातो. तो काहीही बोलत नाही. मग राहत पुन्हा त्याच्या जवळ जातात. पुन्हा त्याचे केस पकडतात आणि त्याला मारतात. मारता- मारता खाली पडतात. यावेळी आजूबाजूचे लोक त्यांनी उठवतात. पण तरिही राहत त्या नोकराला मारणं सोडत नाहीत. ते पुन्हा नोकराला मारू लागतात. त्याला प्रश्न विचारत विचारत राहत त्या नोकराला खोलीच्या दाराशी आणतात. मग पुन्हा त्याला मारतात. पण तरिही नोकर शांत राहतो.
आधी मारहाण आता स्पष्टीकरण…
राहत फतेह अली खान यांनी नोकराला मारहाण केल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर राहत यांच्या स्पष्टीकरणाचा व्हीडिओ समोर आला आहे. यात ज्याला मारहाण केली. त्या नोकराला सोबत घेत राहत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राहत यांनी नोकराची माफी मागितली आहे. त्यानंतर राहत यांनी स्पष्टीकरण दिलंय. हा गुरु आणि शिष्यामधला अंतर्गत विषय आहे. माझ्यासोबत माझा मुलगा आहे, माझा शिष्य आहे. आमचं गुरु शिष्याचं असं नातं आहे की, जेव्हा हा चांगलं काम करतो. तेव्हा त्याचं कौतुक होतं. तर जेव्हा तो चुकतो, तेव्हा त्याला रागावलं देखील जातं, असं राह यांनी सांगितलं आहे.
Update : Rahat Fateh Ali Khan ( @RFAKWorld )issued a clarification regarding his viral video, There was holy water in the bottle pic.twitter.com/oIStHwWXFp
— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) January 27, 2024