Video | ‘देशावर संकट येताच ते बघा पळून चालले’, रातोरात न्यूयॉर्कला जाणारे शाहरुख खानचे कुटुंब नेटकऱ्यांकडून ट्रोल!

बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh khan)  याचा मुलगा आर्यन खान (Aaryan Khan) आणि पत्नी गौरी खान (Gauri Khan) यांना बुधवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर स्पॉट केले गेले.

Video | ‘देशावर संकट येताच ते बघा पळून चालले’, रातोरात न्यूयॉर्कला जाणारे शाहरुख खानचे कुटुंब नेटकऱ्यांकडून ट्रोल!
गौरी खान आणि आर्यन खान
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 1:33 PM

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh khan)  याचा मुलगा आर्यन खान (Aaryan Khan) आणि पत्नी गौरी खान (Gauri Khan) यांना बुधवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर स्पॉट केले गेले. यावेळी हे दोघेही न्यूयॉर्कला रवाना होण्यासाठी विमानतळावर गेले होते. या दोघांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही लोक त्यांना कोरोनाची आठवण करून देत आहेत. तर काही लोक या कठीण काळात देश सोडून चालल्याबद्दल त्यांच्यावर टीका करत आहेत (Social Media User troll Gauri and Aaryan khan As they are traveling to new york during pandemic).

सोशल मीडियावर झाले ट्रोल

वास्तविक, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हल्ली न्यूयॉर्कमध्ये एकटीच राहत आहे. कोरोना काळात, भाऊ आर्यन खान आणि आई गौरी खान हे तिला भेटण्यासाठी निघाले आहेत. अशा स्थितीत लोकांचा रोष या दोघांवर उमटला आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की, ‘हे सेलिब्रेटी फक्त नावाचे भारतीय आहेत, जेव्हा जेव्हा देशावर एखादी समस्या येते तेव्हा ते देशापासून दूर पळून जातात.’ त्याच वेळी, दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, ‘हो, जर भारताची परिस्थिती बिकट झाली, हे तर सर्व परदेशात पळून जातात, इथे पैसे मिळवा पण इथल्या लोकांना गरज पडल्यास बाहेर निघून जा.’

चाहत्यांनी केला प्रश्नांनाचा भडीमार

त्याचबरोबर बरेच सामान्य लोक आणि चाहते प्रश्नांचा भडीमार करत विचारत आहेत की, ‘लॉकडाऊन फक्त सामान्य लोकांसाठी आहे का?, ही माणसे कशी जगभर फिरत आहेत’. त्याचवेळी एका व्यक्तीने लिहिले की, ‘कोणीतरी मालदीवला जात आहे, कोणी न्यूयॉर्कला जात आहे’. त्याचवेळी एकाने लिहिले, ‘त्यांना भारताबाहेरच काढा.’

पाहा व्हिडीओ

 (Social Media User troll Gauri and Aaryan khan As they are traveling to new york during pandemic)

‘हे’ बॉलिवूड स्टार्स पोहोचले मालदीवला

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या शूटिंगला बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडमध्ये चित्रपटांचे शूटींग होत नाहीय आणि लॉकडाऊनमुळे लोकांना घरातच राहावे लागत आहे. दरम्यान, बॉलिवूड स्टार्स मात्र आपल्या घरात राहत नाहीयत. प्रत्येकजण सुट्टीसाठी कुठेना कुठेतरी निघून गेला आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. आलिया भट्ट, रणबीर कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, सारा अली खान, जान्हवी कपूर, दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ सध्या मालदीवमध्ये आहेत.

टीव्ही सेलेब्सला देखील मालदीवची भुरळ

त्याचबरोबर, काही दिवसांपूर्वीच अनेक सेलिब्रिटी व्हेकेशन ट्रीपहून परत आले आहेत. काही दिवसांपूर्वी श्रद्धा कपूर मालदीवच्या सुट्टीवरुन परतली आहे. या व्यतिरिक्त बरेच टीव्ही सेलेब्सही मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. सुरभी ज्योती, टीना दत्ता आणि सृष्टी रोडे देखील सध्या मालदीवमध्ये आहेत. शेफाली जरीवाला आणि आरती सिंहही काही दिवस आधी मालदीवच्या सुट्टीवरून परतल्या आहेत.

(Social Media User troll Gauri and Aaryan khan As they are traveling to new york during pandemic)

हेही वाचा :

Video | कमर तेरी लेफ्ट राईट होले, 37 कोटी व्ह्युज असलेलं गाणं तुम्ही बघितलत का?

Video | टायटॅनिक पोझ देताना वाऱ्याने केला घोटाळा, ‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवाला झाली ‘Oops’ मूमेंटची शिकार!

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.