रस्त्यावरील ट्रकवर लिहिलेल्या ओळी बनल्या बॉलिवूडचं लोकप्रिय गाणं, वाचा ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’चा किस्सा…
1993मध्ये रिलीज झालेल्या ‘1942 : अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटातील एका गाण्याने त्या काळातील तरुणांना अक्षरशः घायाळ केले होते. त्याचबरोबर चित्रपटातील 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या गाण्याने मनात एक मखमली हलचल निर्माण केली. गाण्याचा असा प्रभाव होता की, तरुणाई अक्षरशः फिदा झाली होती.
मुंबई : 1993मध्ये रिलीज झालेल्या ‘1942 : अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटातील एका गाण्याने त्या काळातील तरुणांना अक्षरशः घायाळ केले होते. त्याचबरोबर चित्रपटातील ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या गाण्याने मनात एक मखमली हलचल निर्माण केली. गाण्याचा असा प्रभाव होता की, तरुणाई अक्षरशः फिदा झाली होती. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी हे गाणे अशा काव्यात्मक शैलीत लिहिले आहे की, ते ऐकल्यानंतर मानत कोमल भाव निर्माण होणे स्वाभाविक आहे. आर डी बर्मन यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याला कुमार सानूने मनापासून आपला आवाज दिला.
अभिनेत्री मनीषा कोईराला नावाचा नवा चेहरा त्यावेळी बॉलिवूडमध्ये दाखल झाला होता. या चेहऱ्यावर सर्वत्र कौतुक होत होते. दरम्यान, या गाण्यामुळे मनीषा कोईराला आणि तिचे साधे सौंदर्य अधिक लोकप्रिय झाले. मनीषाचे नैसर्गिक सौंदर्य गाण्याशी पूर्णपणे जुळते. असे वाटते की, हे गाणे फक्त आणि फक्त मनीषा कोईरालाच्या सौंदर्यासाठीच रचले गेले आहे. हे गाणे इतर काही नायिकेवर चित्रित केले असते तर कदाचित ते इतके हिट झाले नसते. मात्र, सुरुवातीला हे गाणे लिहायला जावेद अख्तर विसरलेच होते.
जावेद अख्तर यांनी सुचवली गाण्याची कल्पना!
या गाण्याचा किस्सा सांगताना जावेद अख्तर म्हणाले की, विधू विनोद चोप्रा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते आणि संजय लीला भन्साळी त्यांना सहाय्य करत होते. या चित्रपटासंदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. फराह खानसह अनेक लोक तेथे उपस्थित होते. जेव्हा मी चित्रपटची कथा ऐकली, तेव्हा म्हणालो की या ठिकाणी एखादे गाणे असले पाहिजे. त्यावेळी विधू चोप्रा यांनी जावेद यांना सांगितले की, आता मुलाने मुलीला बसमध्ये पहिल्यांदाच पाहिले आहे, यावर गाणे कसे येणार? यावेळी जावेद अख्तर त्यांच्याशी भांडले आणि त्यात गाणे घ्यायला लावले. यावर ते म्हणाले, ठीक आहे, तुम्ही गाणे लिहा आणि इकडे आणा, जर ते जमले तर आम्ही त्याचा समावेश चित्रपटात नक्की करू.
गाणे लिहायला विसरले जावेदजी!
जावेद अख्तर पुढे म्हणाले, ‘मला सांगण्यात आले की, जेव्हा बुधवारी 4 वाजता आमची बैठक होईल, तेव्हा हे तुम्ही गाणे लिहून आणाल. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे दर आठवड्याला बुधवार येतो, त्यामुळे कोणता बुधवार हे विसरून गेलो आणि बुधवारी मला फोन आला की, माझी संध्याकाळी 4 वाजता मीटिंग आहे आणि तेव्हा माझ्या लक्षात आले की, मी गाणे लिहिणे विसरलो आहे. मग मला गाण्याची आठवण झाली. आता गाणे तर तयार नव्हते.’
ट्रक दिसला नि गाणे सुचले!
त्या दिवसात जावेद अख्तर स्वतःची गाडी स्वतः चालवत असत. त्यांना वांद्रेहून सांताक्रूझला जायला जास्त वेळ लागला नसता. गाडी चालवताना त्यांच्या मनात विचार सुरु होते. इतक्यात कारमधून जात असताना, एका थिएटरच्या बाहेर उभ्या असलेल्या एका ट्रकने त्यांना या गाण्याची प्रेरणा दिली. या ट्रकच्या मागे काही ओळी लिहिलेल्या होत्या आणि त्या पाहून त्यांना वाटले की, ते याच ओळी तिथे जाऊन सांगतील. ते मिटींगला गेले आणि हेच गाणे सांगितले, एक लड़की को देखा तो ऐसा लगा… त्यानंतर या शब्दांचे वर्णन केले. अशाप्रकारे हे गाणे तयार केले गेले.
हेही वाचा :
नवी मालिका, नवी भूमिका अन् नवी स्टाईल… ‘राणा दा’चा कूल लूक चाहत्यांना भलताच आवडला!