मुंबई : कोरोनाच्या वाईट काळात अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) लोकांच्या मदतीसाठी मैदानात उतरला. तेंव्हापासून लोक सातत्याने सोनूकडे विविध प्रकारच्या मदत मागतात. विशेष म्हणजे लोकांच्या मदतीसाठी सोनू कायमच धावून येतो. एखाद्या गावामध्ये जर शाळा नसेल तर तिथे शाळा बांधणे असो किंवा आॅनलाईन शिक्षणासाठी (Education) मुलांना मोबाईल भेट देणे असो सोनू त्याच्या पध्दतीने सर्वांनाच मदत करतो. विशेष: शिक्षणासाठी लागणाऱ्या मदतीसाठी सोनू धावून जातो. आता सोनू सूद फाउंडेशनच्या वतीने यूपीएससीचे (UPSC) कोचिंग विद्यार्थ्यांना मोफत दिले जाणार आहे.
सोनू सूद फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना यूपीएससीचे क्लासेस मोफत दिले जाणार आहेत. यूपीएससीच्या परीक्षेसाठी विद्यार्थी लाखो रूपये खर्च करून कोचिंग लावावे लागते. बऱ्याच वेळा पैसे नसल्याने विद्यार्थ्यांचे IAS होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. आता सोनू सूद फाउंडेशनच्या वतीने देशभरात विद्यार्थ्यांना मोफत IAS चे क्लास देण्यात येणार आहेत. UPSC नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी देशातील सर्वोत्तम कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेऊ शकाल. तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
तुम्हाला सोनू सूदच्या मोफत UPSC कोचिंग क्लास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. सूद चॅरिटी फाउंडेशन soodcharityfoundation.org या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावयाचा आहे. म्हणजेच काय तर आता सोनू सूदमुळे विद्यार्थ्यांचे IAS होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सोनू सूद कायमच चर्चेत राहतो. सोनू अनेकदा चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विविध पोस्ट देखील शेअर करतो.