Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Punjab Assembly Election : सोशल मीडियावर लाखो फॉलोव्हर्स पण मतदान हजारात, पंजाबचा फ्लॉप’स्टार्स’

काल पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यात अनेक दिग्गजांना हार पत्करावी लागली. यात सोशल मीडिया स्टार्सचाही समावेश आहे. सोशल मीडियास्टार सिद्धू मूसवाला यालाही या निवडणुकीत अपयशाचा सामना करावा लागला आहे.

Punjab Assembly Election : सोशल मीडियावर लाखो फॉलोव्हर्स पण मतदान हजारात, पंजाबचा फ्लॉप'स्टार्स'
सिद्धू मूसवाला
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 3:16 PM

मुंबई : काल पंजाब विधानसभा निवडणुकीचा (Punjab election) निकाल लागला. यात अनेक दिग्गजांना हार पत्करावी लागली. यात सोशल मीडिया स्टार्सचाही समावेश आहे. सोशल मीडियास्टार सिद्धू मूसवाला (Sidhu Moosewala) यालाही या निवडणुकीत अपयशाचा सामना करावा लागला आहे. सिद्धूला इन्स्टाग्रामवर जवळपास सात मिलियन फॉलोव्हर्स आहेत. पण त्याला मिळालेली मतं पाहिली तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सिद्धू मूसवाला याला सोशल मीडियावर मिलियनमध्ये फॉलोव्हर्स आहेत. सिद्धूला इन्स्टाग्रामवर जवळपास सात मिलियन फॉलोव्हर्स आहेत. सिद्धूने पंजाबच्या मनसा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्याला 36 हजार 700 मतं मिळाली आहे. सिद्धूसोबतच सोनू सूदची बहिण मालविका सूद सच्चर (Malvika Sood Sachar) हिचाही पराभव झाला आहे.

सोशल मीडिया स्टार निवडणुकीत फ्लॉपस्टार

सिद्धू मूसवाला याला सोशल मीडियावर मिलियनमध्ये फॉलोव्हर्स आहेत. सिद्धूला इन्स्टाग्रामवर जवळपास सात मिलियन फॉलोव्हर्स आहेत. सिद्धूने पंजाबच्या मनसा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्याला 36 हजार 700 मतं मिळाली आहे. तर आपचे उमेदवार विजय सिंगला यांनी सिद्धूला 63 हजार 323 मतांनी हरवलं आहे. सिंगला यांना 1 लाख 23 मतं मिळाली आहेत. त्यामुळे सोशल मीडिया स्टार निवडणुकीच्या रिंगणात मात्र फ्लॉपस्टार ठरलाय.

कोण आहे सिद्धू मूसवाला?

सिद्धू मूसवाला शेतकरी आंदोलनादरम्यान चर्चेत आला होता. त्याने या आंदोलनावर गाणंही लिहीलं होतं. त्याने एक सिनेमा केला आहे. त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता.

सोनू सूदची बहिण मालविका सूद सच्चरचा पराभव

सोनू सूदची बहिण बहिण मालविका सूद सच्चरचाही पराभव झाला आहे. मालविका पेशाने इंजिनिअर आहे. ती कोचिंग सेंटरही चालवते. शिवाय ती शिक्षण क्षेत्रातही काम करते. कोरोना काळात सोनू सूदने अनेकांना घरी जाण्यास मदत केली. याचाही ती भाग होती.

संबंधित बातम्या

झी महागौरव २०२२: रेड कार्पेटवर मराठी कलाकारांचा जलवा

“सहा बोटं असलेल्यांचा..”; भर कार्यक्रमात कंगनाने हृतिकवर साधला निशाणा

कंपनीच्या सीईओपदी राहायचं असेल तर एकटेपणा सोडून राजेश्वरीला करायला लागणार लग्न, काय निर्णय घेणार राजेश्वरी?

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.