Video | जेव्हा ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदना शेतात नांगर चालवते, पाहा व्हिडीओ!

प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना दक्षिणेत धमाका केल्यानंतर आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे. ‘मिशन मजनू’ या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Video | जेव्हा ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदना शेतात नांगर चालवते, पाहा व्हिडीओ!
रश्मिका मंदना
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 9:26 AM

मुंबई : प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना दक्षिणेत धमाका केल्यानंतर आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे. ‘मिशन मजनू’ या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात रश्मिका सोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत दिसणार असून, सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. अगदी कमी कालावधीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी रश्मिका सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती दररोज चाहत्यांसाठी मजेदार व्हिडीओ शेअर करत असते. यावेळी रश्मिकाने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे (South actress Rashmika Mandanna Share farming video on social media).

रश्मिकाने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती शेतात नांगर चालवताना दिसत आहे. रश्मिका हे काम मनापासून करताना दिसत आहे. तिचा लूकही संपूर्ण ग्रामीण महिलेसारखा आहे. तिने सैल शर्टसह तेमट (लुंगी सदृश्य वस्त्र) परिधान केले आहे आणि कमरेवर पंचा बांधला आहे. रश्मिकाचा हा लूक पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.

रश्मिका मंदानाचा व्हिडीओ पाहा :

हा व्हिडीओ शेअर करताना रश्मिकाने लिहिले की, ‘गीत ऐका आणि व्हिडीओ बघा. यापेक्षाही उत्तम काहीही असू शकत नाही. या सीनच्या शूटिंगनंतर मीसुद्धा असाच विचार करत होते. मला हे पात्र साकारण्यात किती मजा आली असेल, हे आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकता.’ व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर Eppadi Iruntha Naanga  हे गाणे सुरू आहे (South actress Rashmika Mandanna Share farming video on social media).

पोगारूमध्ये दिसली होती रश्मिका

सुपरस्टार ध्रुव सर्जासमवेत अभिनेत्री रश्मिका मंदाना ‘पोगारू’ या चित्रपटामध्ये दिसली होती. रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट वादात सापडला होता. या चित्रपटावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या अशी काही दृश्ये आणि संवाद आहे, ज्याविरोधात ब्राह्मण समाजाने आक्षेप नोंदवला आहे. हा वाद इतका वाढला की, आता या चित्रपटाच्या निर्मात्यांना ‘पोगारू’ मधून जवळपास 16 सीन कापावे लागले आहेत.

खरं तर, ब्राह्मण समाजाने त्यांच्यावर या चित्रपटाच्या काही दृश्यांमधून व संवादांमधून आपल्या भावना दुखावल्याचा आरोप केला होता. यानंतर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स आणि कर्नाटक डेव्हलपमेंट बोर्डाच्या वतीने बैठक घेण्यात आली आणि त्यानंतर सुमारे 16 सीन कापण्याचे निश्चित करण्यात आले. हा चित्रपट 19 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. परंतु, सीन कापण्यामुळे तो सध्याच्या काळात थिएटरमधून काढून टाकण्यात आला आहे.

(South actress Rashmika Mandanna Share farming video on social media)

हेही वाचा :

Nikki Tamboli | ‘बिग बॉस 14’ची स्पर्धक निक्की तंबोलीला कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती!

Video | आपल्या गोड आवाजाने अरुणिताने लावलंय प्रेक्षकांना वेड, ‘या’ कारणामुळे सध्या आलीय चर्चेत! पाहा व्हिडीओ…

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.