प्रेग्नन्सी, ड्रग्ज ते अनुराग कश्यपबद्दल बेधडक बोल, आलिया कश्यपच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या नकारत्मक प्रतिक्रिया!

| Updated on: Jul 26, 2021 | 11:03 AM

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांची मुलगी आलिया कश्यप (aaliyah kashyap) आपल्या यूट्यूब व्हिडीओंसाठी सतत चर्चेत असते.

प्रेग्नन्सी, ड्रग्ज ते अनुराग कश्यपबद्दल बेधडक बोल, आलिया कश्यपच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या नकारत्मक प्रतिक्रिया!
Anurag-Aaliyah
Follow us on

मुंबई : प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांची मुलगी आलिया कश्यप (aaliyah kashyap) आपल्या यूट्यूब व्हिडीओंसाठी सतत चर्चेत असते. आलिया तिचा प्रियकर शेन ग्रेगोअरसोबत फोटो शेअर करण्यासही अजिबात कचरत नाही. आलियाने काही काळापूर्वी आपल्या व्लॉग्सद्वारे अशा अनेक गोष्टी चाहत्यांसह शेअर केल्या होत्या, ज्यामुळे तिला सोशल मीडियावर बऱ्याच नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या.

वास्तविक, अलीकडेच आलिया कश्यपने तिची गर्भधारणा, प्रियकर, ड्रग्ज आणि अडल्ट चित्रपट पाहण्यावरुन आपल्या ‘आस्किंग माय डॅड ऑकवर्ड क्वेश्चन्स’ यापैकी एका सेशनमध्ये वडील अनुराग कश्यपशी चर्चा केली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. आता एका चॅट शो दरम्यान, आलियाने उघड केले की, या सर्व विषयांवर बोलण्यामुळे लोकांनी तिच्यावर खूप टीका केली आहे.

करावा लागतोय द्वेषाचा सामना!

आलिया कश्यप म्हणाली की आई-वडिलांसोबत अशा गोष्टी बोलल्यामुळे सोशल मीडियावर लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. लोकांच्या कमेंट सांगताना आलिया म्हणते, ‘माझ्या वडिलांसोबत मी बनवलेल्या व्हिडीओच्या कमेंट तुम्ही पाहिल्या पाहिजेत. माझ्या चॅनेलवर लोक काय पाहण्यासाठी आले हे मला माहित नाही. पण मला खूप द्वेषाचा सामना करावा लागत आहे. ती पुढे म्हणते, ‘आपण आपल्या पालकांशी अशा गोष्टी कशा बोलू शकता? तुम्हाला शरम वाटते का?’ अशा कमेंटही आल्या आहेत.

आलियाचे प्रश्न

‘आस्किंग माय डॅड ऑकवर्ड क्वेश्चन्स’ या व्हिडीओमध्ये आलियाने तिच्या वडिलांना अर्थात अनुराग कश्यपला विचारले होते की, जर तुम्हाला मी गर्भवती असल्याचे सांगितले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? यावर अनुरागने उत्तर दिले की, “मी तुला विचारेन की, तुला खरोखर हे करायचे आहे काय? ‘ तुला जे काही करायचं आहे, ते कर, मी नेहमी तुझ्याबरोबर असेन, तुला माहितच आहे.”

अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यप सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. आलिया तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे बर्‍याचदा इंटरनेटवर वर्चस्व गाजवते. या चर्चित स्टारकिडच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे बिकिनीतील असे बरेच फोटो आहेत, जे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. आलिया तिच्या पोस्टबद्दल बरीच लोकप्रिय झाली आहे.

(Speak boldly about pregnancy, drugs to Anurag Kashyap, netizens’ negative reactions to aaliyah Kashyap’s on video)

हेही वाचा :

‘राज कुंद्राने शूटसाठी तुम्हाला फोर्स केला नव्हता’, पूनम पांडे-शर्लीन चोप्रावर भडकली गहना वशिष्ठ

Raj Kundra Case : उमेश कामतच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्समधून खुलासा, गेहना वसिष्ठचं फक्त ‘हॉटशॉट’च नाही तर ‘हॉटहिट’ मध्येही काम