Sridevi Birth Anniversary | ‘हिरो’पेक्षाही जास्त मानधन घेणारी अभिनेत्री, बॉलिवूडची पहिली ‘लेडी सुपरस्टार’ श्रीदेवी
एक काळ असा होता, जेव्हा श्रीदेवी (Sridevi) बॉलिवूडमध्ये राज्य करायची. आज अभिनेत्री या जगात नाही, पण जेव्हा कधी तिचा एखादा चित्रपट टीव्हीवर प्रसारित होतो, तेव्हा सर्व जुन्या आठवणी लोकांच्या मनात ताज्या होतात.
मुंबई : एक काळ असा होता, जेव्हा श्रीदेवी (Sridevi) बॉलिवूडमध्ये राज्य करायची. आज अभिनेत्री या जगात नाही, पण जेव्हा कधी तिचा एखादा चित्रपट टीव्हीवर प्रसारित होतो, तेव्हा सर्व जुन्या आठवणी लोकांच्या मनात ताज्या होतात. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवीच्या अचानक निधनाने चित्रपटसृष्टी आणि तिच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. श्रीदेवीने आपल्या फिल्मी करिअरमध्ये 300हून अधिक चित्रपट केले. हिंदीबरोबरच तिने दक्षिणात्य चित्रपटांमध्येही खूप काम केले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली ‘लेडी सुपरस्टार’
श्रीदेवी जेव्हाही मोठ्या पडद्यावर यायच्या, तेव्हा चाहत्यांचे डोळे त्यांच्यावर स्थिरावलेले असायचे. त्यांनी ‘चांदनी’, ‘चालबाज’, ‘नागिन’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. 13 ऑगस्ट 1963 रोजी जन्मलेल्या श्रीदेवींनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांना त्यांच्या काळातील ‘लेडी अमिताभ बच्चन’ म्हटले जायचे. श्रीदेवी बॉलिवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टार होत्या. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही तुम्हाला त्यांच्या जीवन आणि कारकीर्दीशी संबंधित काही गोष्टी या लेखात सांगणार आहोत.
अभिनेत्यापेक्षा अधिक मानधन
80च्या दशकांत जेव्हा चित्रपट केवळ अभिनेत्याच्या जोरावर चालायचे, तेव्हा श्रीदेवी या एकमेव अभिनेत्री होत्या, ज्यांनी बड्या कलाकारांना टक्कर दिली. श्रीदेवी अशा एकमेव अभिनेत्री होत्या, ज्यांच्या नावाने प्रेक्षक स्वतः चित्रपटगृहांकडे ओढले जायचे. श्रीदेवीने आपल्या अभिनयाच्या बळावर एक असे स्थान निर्माण केले, जे त्या काळात अभिनेत्रीसाठी बॉलिवूडमध्ये असणे फार कठीण होते. याच कारणामुळे त्या काळात श्रीदेवी एका अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन आकारायच्या. त्यांनी ‘नगीना’ चित्रपटासाठी ऋषी कपूरपेक्षा जास्त मानधन घेतले होते.
दाक्षिणात्य चित्रपटांतून कमावले नाव
श्रीदेवीने केवळ हिंदी चित्रपटातच नव्हे तर, दाक्षिणात्य चित्रपटातही खूप नाव कमावले. त्यांनी हिंदी तसेच दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. हिंदी चित्रपटांमध्ये श्रीदेवीकडे व्यावसायिक नायिका म्हणून पाहिले जात होते, तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्या एक प्रमुख अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. श्रीदेवीच्या तमिळ चित्रपटांमध्ये ‘16 वैथिनीलये’, ‘मंदारू मुदिचू’, ‘सिगाप्पू रोजकाल’, ‘कल्याणरमन’, ‘जोनी’, ‘मींदूम कोकिला’ यासारख्या उत्कृष्ट चित्रपटांचा समावेश आहे.
15 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन
1998मध्ये ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटानंतर श्रीदेवीने ब्रेक घेतला. तब्बल 15 वर्षांनंतर, 2013 मध्ये, त्यांनी ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटातून जबरदस्त पुनरागमन केले. 50वर्षीय श्रीदेवीने या चित्रपटातील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गल्ला जमवला. यानंतर, 2018 मध्ये श्रीदेवींनी ‘मॉम’ चित्रपटात काम केले, हा चित्रपट देखील प्रेक्षकांना खूप आवडला.
‘झिरो’ ठरला शेवटचा चित्रपट
शाहरुख खानचा ‘झिरो’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. करिअरच्या सुरुवातीला श्रीदेवीला हिंदी बोलण्यात थोडी अडचण आली. पण नंतर त्यांनी त्यांच्या हिंदीवर काम केले आणि एकामागून एक सुपरहिट चित्रपट दिले. श्रीदेवी शेवट शाहरुख खानच्या ‘झिरो’ चित्रपटात दिसल्या होती. या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती.
हेही वाचा :
‘और बताओ कैसा लगा गाना?’, बादशाह आणि सहदेवचं ‘बचपन का प्यार’ गाणं पाहिलंत?
‘केवळ मराठी व्यक्तीरेखा म्हणून मराठी कलाकार असं नको’, सचिन पिळगावकरांनी व्यक्त केली खंत