RRR Movie Collection : ‘आरआरआर’चा बॉक्सऑफिसवर कल्ला, पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी वजनदार गल्ला…
RRR Movie Collection : एस. एस. राजामौली यांचा सुपरडुपर हिट सिनेमा आरआरआरने पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशीही या सिनेमाने कोट्यावधींचा गल्ला जमवलाय.
मुंबई : एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांचा सुपरडुपर हिट सिनेमा आरआरआरने (RRR Movie) पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशीही या सिनेमाने कोट्यावधींचा गल्ला जमवलाय. पहिल्या दिवशी या सिनेमाने भारतात 20.07 कोटींची कमाई केली आहे. तर काल म्हणजे दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 23.75 कोटींचा गल्ला जमवलाय. परदेशातही या सिनेमाने आपली जादू कायम ठेवली आहे. अमेरिका, कॅनडा, ब्रिटनमध्येही या सिनेमाने कोट्यावधींची कमाई केली आहे. या सिनेमात एनटीआर राम चरण (NTR Ram Charan) आलिया भट (Alia Bhatt) अजय देनगन (Ajay Devgn) हे कलाकार पहायला मिळत आहेत. कमाल दिग्दर्शन, दमदार अभिनय, गाणी, अॅक्शन म्हणजे इंटरटेनमेंटचं पू्र्ण पॅकेज असेलेला हा सिनेमा अनेकांच्या पसंतीला उतरतोय.
शोले, नाचो नाचो,इत्थरा, राम राघव ही या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. या गाण्यांचं म्युझिक काळजात घर करतंय.
आरआरआरची कमाई
तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार आरआरआर या सिनेमाने पहिल्या दिवशी 20.07 कोटींची कमाई केली आहे. तर काल म्हणजे दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 23.75 कोटींचा गल्ला जमवलाय. तर आतापर्यंत या सिनेमाची एकूण कमाई 43.83 कोटी रूपयांची आहे.
#RRR *HINDI* RRRoars on Day 2… Glowing word of mouth has come into play… Multiplexes witness BIG GAINS on Day 2… Single screens ROCKING… Expect BIGGERRR GROWTH on Day 3, should hit ₹ 70+ cr weekend… Fri 20.07 cr, Sat 23.75 cr. Total: ₹ 43.82 cr. #India biz. pic.twitter.com/y6BFnDKwtm
— taran adarsh (@taran_adarsh) March 27, 2022
परदेशातही बोलबाला
आरआरआर या सिनेमाने प्रदर्शनाच्या झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड ब्रेक कमाईला सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने कोट्यावधींचा गल्ला जमवलाय. पहिल्याच दिवशी या सिनेमाने 20.07 कोटींची कमाई केली आहे. ही कमाई कश्मिर फाईल्सपेक्षा खूप जास्त आहे. द काश्मीर फाईल्सने पहिल्या दिवशी 3.55 कोटींची कमाई केली होती. तर आरआरआरने परदेशातही छप्पर तोड कमाई केली आहे. अमेरिका आणि कॅनडात या सिनेमाने 26.46 कोटी इतकी कमाई केली आहे. तर ब्रिटनमध्ये 2.40 कोटींचा गल्ला सिनेमाने जमवलाय.
चित्रपटाची कथा
देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ या चित्रपटात दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे. ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेत राम हा पोलीस अधिकारी म्हणून काम करत असतो, तर दुसरीकडे भीम हा अत्यंत साधा माणूस आहे. आग आणि पाणी या संकल्पनेवर या दोन व्यक्तीरेखा पडद्यावर फुलवल्या आहेत. राम हा आगीसारखा तापट, जिद्दी, शक्तीशाली आहे. ज्याच्या कामावर एकीकडे ब्रिटीश खूशही असतात आणि दुसरीकडे त्याच्या शक्तीशाली व्यक्तिमत्त्वाकडे पाहून भयभीतही होतात. भीम हा अत्यंत ताकदवान आहे, पण त्याच्या ताकदीचा वापर जेव्हा गरज असते, तेव्हाच तो करतो. लेडी स्कॉट ही स्वत:च्या स्वार्थासाठी मल्ली नावाच्या एका मुलीला तिच्या आई आणि कुटुंबापासून दूर नेते. तिला सोडवण्यासाठी भीम दिल्लीला येतो आणि तिथेच राम त्याला भेटतो. या दोघांची मैत्री कशी होते, मल्लीला सोडवण्यात भीमला यश मिळेल का, हे तुम्हाला चित्रपटात पहायला मिळेल. मात्र गोष्ट फक्त एवढीच नाही. यात अनेक ट्विस्ट आहेत, ड्रामा आहे, भरभरून अॅक्शन आहे, डान्स आहे, थोडीफार कॉमेडीही आहे. राजामौलींचा हा चित्रपट म्हणजे ‘फुल पॅकेज’ आहे.
संबंधित बातम्या