अभिनेत्याचा प्रेरणादायी प्रवास; चहावाला ते थेट बॉलिवूड स्टार, सलमान खानचा को-स्टार राहिलेला हा अभिनेता कोण?
कुटुंब चालवण्यासाठी चक्क चहा आणि भाजी विकण्याचा व्यवसाय केलेल्या या अभिनेत्याला आता कोणत्याही ओळखीची गरज नाही. सलमान खानचा को-स्टार राहिलेल्या या अभिनेत्याने आपल्या मेहनतीवर आपलं साम्राज्य उभं केलं आहे. आणि आज या अभिनेत्याची करोडोंची संपत्ती आहे.

मनोरंजन विश्वात असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी अनेक अडचणींचा सामना करत आधी छोट्या पडद्यावर आणि नंतर मोठ्या पडद्यावर स्वतःचे स्थान निर्माण केले. असाच एक विनोदी अभिनेता आहे ज्याने आयुष्यातील प्रत्येक संघर्षाला धैर्याने तोंड दिलं आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर यश आणि नाव मिळवलं. या अभिनेत्याने अनेक रिअॅलिटी शोमध्येही आपलं कौशल्य दाखवून दिलं आहे.
कुटुंब चालवण्यासाठी चक्क चहा आणि भाजी विकण्याचा व्यवसाय केला
या अभिनेत्याने अनेक कठीण परस्थितीतून जात आपलं वैभव उभं केलं आहे. बालपणातही आणि करिअरच्या सुरुवातीच्या काळातही या अभिनेत्याने खूप गरिबी पाहिली होती. त्याला उदरनिर्वाहासाठी, आपलं कुटुंब चालवण्यासाठी चक्क चहा आणि भाजी विकण्याचा व्यवसाय करावा लागला होता. हा अभिनेता म्हणजे सुदेश लाहिरी.
कॉमेडी शोजच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये आपला ठसा उमटवणारे कॉमेडियन सुदेश लाहिरी यांनी अलीकडेच अभिनेत्री अर्चना पूरण सिंगच्या यूट्यूब शोमध्ये हजेरी लावली होती. यादरम्यान, अभिनेत्री आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाशी बोलताना त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले.
अभिनेत्याला लाइव्ह शोमध्ये थप्पड मारली
अभिनेता सुदेश यांना आता कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही पण त्यांनी ज्यापद्धतीने बॉलिवूडपासून ते टिव्ही इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख बनवली त्यांच्या या मेहनतीचं अत्यंत कौतुक आहे. सुदेश लाहिरी यांनी नट-बोल्ट बनवण्याच्या दुकानातही बराच काळ काम केलं आहे.
सुदेश लाहिरी यांनी अर्चना पूरण सिंग यांच्या मुलाला सांगितले की, ते भाजी विकायचे. यावर अभिनेत्रीचा मुलगा आयुष्मानने म्हटलं की, तो जर त्यावेळी असता तर त्याने सुदेशचे संपूर्ण दुकान विकत घेतले असते.
सुदेश यांनी लाइव्ह शोबद्दलचा एक किस्साही सांगितला ते म्हणाले की, त्यांनी जेव्हा लाइव्ह शो करायला सुरुवात केली तेव्हा त्याचा अनुभव फारसा चांगला नव्हता. मात्र याच अडचणींनी प्रत्येक परिस्थितीसाठी तयार केलं असही सुदेश म्हणाले.
दरम्यान सुदेश लाहिरी यांनी त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग शेअर केला, की ते गाणे गात होते आणि लाइव्ह शो करत होते जेव्हा एका मद्यधुंद व्यक्तीने त्यांना सर्वांसमोर थप्पड मारली होती. त्या व्यक्तीने अभिनेत्याला एवढ्या जोरात चापट मारली की त्याच्या हातातून माईक खाली पडला. सुदेश लाहिरी सांगतात की तेव्हा त्यांना खूप अपमानास्पद वाटलं होतं. मात्र, त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला होता.
त्या घटनेनंतर जेव्हा सुदेश घरी आला तेव्हा ते मोठ्याने रडले आणि त्यांनी आपल्या पत्नीला स्पष्टपणे सांगितले की ते पुन्हा त्या ठिकाणी जाणार नाही. सुदेशने करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेक अडचणींचा सामना केला हे याच प्रसंगावरून नक्कीच दिसून येतं.
View this post on Instagram
कर्जामुळे घर विकावं लागलं
एवढच नाही तर त्यांनी गरज होती म्हणून कर्ज घेतले होते पण परिस्थितीमुळे ते फेडणं शक्य नव्हत म्हणून त्यांना त्यांचं घर विकावं लागलं होतं. घर विकल्यानंतर ते कुटुंबासह भाड्याच्या घरात राहायला गेले. मात्र सुदेश यांनी हार न मानता परिस्थितीवर मात करत मेहनतीने यश मिळवलं आहे. त्याच मेहनतीच फळ म्हणजे आज सर्वत्र त्यांचं नाव आहे.
सुदेश लाहिरीला त्याच्या अल्फा गड्डी या शोमधून ओळख मिळाली. अल्फा गड्डीचे शो केवळ देशातच नव्हे तर जगभरात अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आपल्या कॉमेडी करिअरला नवी दिशा देणारा हा अभिनेता सलमान खानसोबत रेडी, ग्रेट ग्रँड मस्ती, मुन्ना मायकल, टोटल धमाल यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसले आहेत.