सनी लिओनीचा नऊवारीतील किलर लूक पाहिलात?
'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या सिनेमात नृत्यांगनेच्या रुपात वावरणाऱ्या हेराची भूमिका सनी साकारत आहे
मुंबई : भीमा कोरेगावमधील ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटात प्रख्यात अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ (The Battle Of Bhima Koregaon) या सिनेमातील सनीचा मराठमोळा लूक सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आणि फर्स्ट लूक रिलीज केले. (Sunny Leone Marathi look in The Battle Of Bhima Koregaon)
नृत्यांगनेच्या रुपात वावरणाऱ्या हेर म्हणजे गनिमाच्या भूमिकेत सनी लिओनी दिसणार आहे. 1795 ते 1818 या कालावधीत ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या सिनेमाचे कथानक घडते. प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल महार योद्ध्याची भूमिका साकारणार आहे.
‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटाचे दिग्दर्शक-निर्माते आणि गीतकार म्हणून रमेश थेटे जबाबदारी सांभाळत आहेत. सनीच्या व्यक्तिरेखेबद्दल थेटे यांनी गुप्तता पाळणं पसंत केलं आहे. सनी या चित्रपटात एका नृत्यांगनेच्या भूमिकेत आहे, मात्र प्रत्यक्षात ती हेरगिरी करत असते, असं रमेश थेटे यांनी सांगितलं.
ARJUN RAMPAL – DIGANGANA – SUNNY LEONE… First look posters of #TheBattleOfBhimaKoregaon… Stars #ArjunRampal, #DiganganaSuryavanshi and #SunnyLeone… Directed by Ramesh Thete… 2021 release. pic.twitter.com/nToepDLaTI
— taran adarsh (@taran_adarsh) December 10, 2020
बोल्ड अँड ब्यूटिफूल ते मराठमोळा लूक
बोल्ड आणि ब्यूटिफूल भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सनीला मराठमोळ्या वेशात पाहणं हा चाहत्यांसाठी सुखद धक्का आहे. पॉर्न फिल्म इंडस्ट्रीपासून सनीची सुरुवात झाली. 2012 मध्ये सनीने जिस्म 2 मधून बॉलिवूडमध्ये पाय ठेवलं, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अगदी बॉईज या मराठी सिनेमातही तिचे दर्शन घडले. मात्र एक पहेली लीला, रागिणी एमएमएस, मस्तीजादे, बेईमान लव्ह अशा मादक भूमिकांपासून अभिनेत्री होण्याकडे तिचा प्रवास होताना दिसत आहे.
मराठमोळ्या भूमिकेतील हिंदी अभिनेत्री
हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य व्यक्तिरेखेला मराठी पार्श्वभूमी फार क्वचितच दाखवली जाते. केवळ नोकरांच्या भूमिकेत दाखवला जाणारा मराठी माणूस हा कायमच टीकेचा विषय राहिला आहे. अलिकडे बाजीराव मस्तानी चित्रपटात काशिबाईंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रियांका चोप्राचा मराठमोळा लूक भाव खाऊन गेला होता. प्रियांकाने कमिने, अग्निपथ या सिनेमातही मराठमोळा बाज दाखवला.
सिंघम रिटर्न्समध्ये करिना कपूर, अग्निपथमध्ये कतरिना कैफ, अय्यामध्ये राणी मुखर्जी यांचे मराठमोळे लूक पाहायला मिळाले. ‘इंग्लिश विंग्लिश’ सिनेमात श्रीदेवीने साकारलेली शशी गोडबोले लक्षवेधी ठरली होती. (Sunny Leone Marathi look in The Battle Of Bhima Koregaon)
अर्जुन रामपाल महार समाजाचा नायक
‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटात अर्जुन रामपाल महार समाजाचा नायक आहे. “अर्जुनचं व्यक्तिमत्त्व आणि देहयष्टी सिद्धांकच्या भूमिकेसाठी चपखल आहे. सिद्धांक हा महार समाजाचा योद्धा आहे. अस्पृश्यांचा आवाज बुलंदपणे मांडणारा तो नायक आहे. या व्यक्तिरेखेसाठी अर्जुनची निवड सार्थ ठरली आहे” असं रमेश थेटे म्हणतात. या चित्रपटात अभिनेत्री दिगंगना सूर्यवंशीही झळकणार आहे. हा चित्रपट 2021 च्या उत्तरार्धात रिलीज होण्याची अपेक्षा आहे.
इतिहास काय सांगतो?
1 जानेवारी 1818 रोजी पुण्यातील कोरेगाव भीमा भागात झालेल्या युद्धात दुसरे बाजीराव पेशवा यांच्या सैन्याविरुद्ध लढलेल्या ब्रिटीश सैन्यात महार सैनिक असल्याचे म्हटले जाते.
“भीमा कोरेगावची लढाई ही शोषित आणि समानतेच्या हक्कापासून वंचित राहिलेल्या समाजातील उदासीन घटकांची योग्यता, त्याग आणि पराक्रम यांचे प्रतीक आहे” असं रमेश थेटे म्हणाले. लढ्याचा इतिहास चांगल्या प्रकारे जाणून त्याद्वारे प्रेक्षकांनी प्रेरित व्हावे, यासाठी विषय निवडला, असं थेटे म्हणाले.
संबंधित बातम्या :
VIDEO : सपना चौधरीच्या गाण्यावर सनी लिओनीचा नागिन डान्स
प्रभाकर येडलेंच्या आठवणीने सनी लिओनी ढसाढसा रडली
(Sunny Leone Marathi look in The Battle Of Bhima Koregaon)