Sushant Singh Rajput Case | सिद्धार्थ पिठाणीची अटक रियाला देखील अडचणीत आणणार? अडचणी आणखी वाढण्याची शक्यता!

सिद्धार्थला हैदराबादमध्ये अटक करण्यात आली असून, आता त्याला मुंबईत आणण्यात आले आहे. सिद्धार्थवर सुशांतला ड्रग्ज पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिद्धार्थच्या अटकेनंतर या प्रकरणात आधीच नाव असलेल्या अनेक लोकांचे त्रास पुन्हा वाढू शकतात.

Sushant Singh Rajput Case | सिद्धार्थ पिठाणीची अटक रियाला देखील अडचणीत आणणार? अडचणी आणखी वाढण्याची शक्यता!
सुशांत सिंह राजपूत
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 2:34 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) गेल्या वर्षी 14 जूनला या जगाचा निरोप घेऊन निघून गेला. सुशांत प्रकरणाच्या चौकशीत सीबीआय आणि एनसीबी सध्या चौकशी करत आहेत. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात एनसीबीने अनेक ड्रग पेडलर्स आणि सुशांतच्या जवळच्या काही लोकांना अटक केली होती. यात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), तिचा भाऊ शौविक (Showik) यांचा समावेश होता. मात्र, आता सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी (Siddharth Pithani) याला एनसीबीने अटक केली आहे (Sushant Singh Rajput Case NCB Arrest Siddharth Pithani rhea chakraborty will be in trouble).

वृत्तानुसार, सिद्धार्थला हैदराबादमध्ये अटक करण्यात आली असून, आता त्याला मुंबईत आणण्यात आले आहे. सिद्धार्थवर सुशांतला ड्रग्ज पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिद्धार्थच्या अटकेनंतर या प्रकरणात आधीच नाव असलेल्या अनेक लोकांचे त्रास पुन्हा वाढू शकतात.

रिया चक्रवर्तीची समस्या वाढणार?

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. रियावर सुशांतला ड्रग्ज पुरवल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही, तर रियाला 1 महिन्यासाठी तुरुंगाची हवा देखील खावी लागली होती. सुमारे एक महिन्यानंतर रियाला जामीन मंजूर करण्यात आला होता. रिया यावेळी जामिनावर बाहेर आहे. मात्र, सिद्धार्थच्या अटकेनंतर रियाच्या अडचणी वाढू शकतात. रियासंदर्भात चौकशीत सिद्धार्थही खुलासे करू शकतो, असे म्हटले जाते (Sushant Singh Rajput Case NCB Arrest Siddharth Pithani rhea chakraborty will be in trouble).

एनसीबीच्या आरोपपत्रात रियाचे नाव

एनसीबीने काही काळापूर्वी सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील ड्रग्स अँगलमध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती यांच्यासह 33 जणांवर आरोप केले गेले आहेत. आरोपपत्रात रियावर नोव्हेंबर 2019पासून सुशांतला औषधे पुरवल्याचा आरोप आहे. रियाने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, ती ड्रग्ज आणत असे आणि तिचा भाऊ शौविक याला औषधे खरेदी करण्यासाठी पैसे हस्तांतरित करत होती.

सुशांतच्या पुण्यतिथीपूर्वी शेअर केली भावनिक पोस्ट

सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती मनाने पूर्णपणे खचली आहे. आता ती पूर्वीप्रमाणेच स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. ती आता सोशल मीडियावर देखील अ‍ॅक्टिव झाली आहे. कोरोना काळातही ती लोकांना मदत करत आहे. गुरुवारी रियाने एक पोस्ट शेअर करत सांगितले की, ती अनेक वेदनांमुळे  मजबूत झाली आहे. रियाने सोशल मीडियावर लिहिले, ‘मोठ्या अडचणींना सामोरे गेल्यानंतर आपल्याला खूप सामर्थ्य मिळाले आहे. यासाठी तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. माझ्यासाठी थांबावं लागेल. प्रेम रिया’.

(Sushant Singh Rajput Case NCB Arrest Siddharth Pithani rhea chakraborty will be in trouble)

हेही वाचा :

PHOTO | ‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरी पतीसह नव्या माध्यमात झळकणार? पाहा सपनाचा जबरदस्त ‘कमबॅक’ प्लॅन

OTT | ‘द फॅमिली मॅन’, ‘काला’सोबतच ‘या’ वेब सीरीजदेखील करतील तुमचं मनोरंजन, आवर्जून पहाच!

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.