पहिल्यांदाच दिसले सुशांतच्या वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य! ‘छिछोरे’ला पुरस्कार मिळाल्यावर व्यक्त केला आनंद!

जेव्हा सुशांतच्या 'छिछोरे' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची बातमी जेव्हा त्याच्या वडिलांकडे पोहोचली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर कित्येक महिन्यांनी एक हसू आले आणि ते म्हणाले, ‘जरासा आनंद मिळाला’.

पहिल्यांदाच दिसले सुशांतच्या वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य! ‘छिछोरे’ला पुरस्कार मिळाल्यावर व्यक्त केला आनंद!
के.के. सिंह आणि सुशांत
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 11:52 AM

मुंबई : नुकतीच 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून, त्यामध्ये दिवंगत अभिनेता  सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि श्रद्धा कपूर अभिनित ‘छिछोरे’ (Chhichhore) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट 2019मध्ये रिलीज झाला होता, जो प्रेक्षकांना खूपच आवडला होता. श्रद्धा आणि सुशांतशिवाय या चित्रपटात वरुण शर्मा, प्रतीक बब्बर यांच्यासोबत आणखी अनेक कलाकार होते. सुशांतच्या चित्रपटाला हा पुरस्कार मिळाल्यानंतर आता त्याचे वडील के. के. सिंह (KK Singh) यांनीही आनंद व्यक्त केला आहे (Sushant Singh Rajput Father KK singh reaction after chhichhore won national film award).

मागील वर्षी जूनमध्ये सुशांत त्याच्या मुंबईतील घरात मृत अवस्थेत आढळला होता. मुलाच्या मृत्यूच्या दु:खामुळे त्याचे वडील पूर्णपणे खचून गेले आहेत. तथापि, जेव्हा सुशांतच्या ‘छिछोरे’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची बातमी जेव्हा त्याच्या वडिलांकडे पोहोचली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर कित्येक महिन्यांनी एक हसू आले आणि ते म्हणाले, ‘जरासा आनंद मिळाला’.

‘धोनी’कडून होत्या अपेक्षा!

के.के. सिंह यांनी प्रथम आपल्या मुलाच्या चित्रपटाच्या पुरस्काराची बातमी मोठ्या मुलीला फोनवरून दिली. के.के. सिंह यांनी असेही म्हटले आहे की, सुशांतच्या ‘धोनी’ चित्रपटाकडून आपल्याला मोठ्या आशा होत्या, परंतु तो चित्रपट फारशी जादू दाखवू शकला नाही आणि त्यानंतर निराशाही झाली.

सुशांतचे वडील त्याच्या ‘धोनी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट मानतात आणि त्यांनी हा चित्रपट बर्‍याच वेळा पाहिला आहे. के. के. सिंह म्हणाले की, आपल्या मुलाला त्यांना अभियंता करायचे होते, पण तो टीव्ही मालिकांच्या जगात गेला. मात्र, मुलाच्या शोचे प्रत्येक भाग त्यांनी पाहिले असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

पुरस्कार पाहायला सुशांतच नाही!

यावर्षी ‘छिछोरे’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, पण या चित्रपटाचा मुख्य अभिनेता सुशांत सिंह राजपूत गेल्या वर्षी 14 जून रोजी या जगाचा निरोप घेऊन गेला आहे. त्याने आत्महत्या केल्यानंतर बरीच खळबळ उडाली होती. त्याच्या आत्महत्येची अनेक कारणे माध्यमांतून समोर आली होती, त्यातील एक कारण म्हणजे त्याच्या चित्रपटांना प्रोत्साहन न मिळणे, हे देखील होते. कारण, गेल्यावर्षी ‘छिछोरे’ चित्रपटाला कोणताही पुरस्कार देण्यात आला नव्हता. तर, ‘गल्ली बॉय’सारख्या चित्रपटाला पुरस्कार मिळाले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर या गोष्टी बऱ्याच चर्चेत आल्या होत्या (Sushant Singh Rajput Father KK singh reaction after chhichhore won national film award).

‘छिछोरे’साठी सुशांतच कौतुक!

सप्टेंबर 2019मध्ये प्रदर्शित झालेला ‘छिछोरे’ हा चित्रपट सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मुलाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्याचा हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं कौतुकंही करण्यात आलं होतं.

‘छिछोरे’ हा एक अत्यंत सकारात्मक चित्रपट होता. “आत्महत्येविरोधात युद्ध” अशी या सिनेमाची थीम लाईन होती. अशा प्रकारच्या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्याने स्वत: आत्महत्या करणे हे खरंच धक्कादायक आहे. या चित्रपटात सुशांत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या मुलाला पुन्हा जीवनाचा अर्थ समजावून सांगतो. जीवन किती मौल्यवान असतं, हे या चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्याने केला होता.

(Sushant Singh Rajput Father KK singh reaction after chhichhore won national film award)

हेही वाचा :

National Film Awards | वाढदिवसाआधीच मोठी भेट! कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर!

गर्दीनं डोकं फिरलं अन् ‘डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया…’ सूचलं; वाचा अफलातून किस्सा!

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.