Tarini | तारिणीच्या ‘त्या’ 6 धाडसी महिलांची कथा रुपेरी पडद्यावर, केंद्रीय मंत्र्याची लेक झळकणार मुख्य भूमिकेत!
काल अर्थात 8 मार्च रोजी ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने ‘हिमश्री फिल्म’ आणि ‘टी-सीरीज’ने मिळून त्यांचा ‘तारिणी’ हा नवा प्रोजेक्ट जाहीर केला. ‘तारिणी’ हा नौदलाच्या सहा धडाकेबाज महिला अधिकाऱ्यांवर आधारित चित्रपट आहे.
मुंबई : काल अर्थात 8 मार्च रोजी ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने ‘हिमश्री फिल्म’ आणि ‘टी-सीरीज’ने मिळून त्यांचा ‘तारिणी’ हा नवा प्रोजेक्ट जाहीर केला. ‘तारिणी’ हा नौदलाच्या सहा धडाकेबाज महिला अधिकाऱ्यांवर आधारित चित्रपट आहे. या महिला अधिकारी बोटीच्या सहाय्याने जगाच्या सागरी प्रवासाला निघाल्या होता. 19 सप्टेंबर 2017 रोजी वर्तिका जोशी, प्रतिभा जामवाल, पी. स्वाती, एस. विजया, ऐश्वर्या आणि पायल गुप्ता यांनी गोवा येथून भारतीय नौदलाच्या सेलिंग बोट ‘आयएनएस तारिणी’वरुन जगभ्रमंतीचा प्रवास सुरू केला आणि 19 मे, 2018 रोजी त्या 21,600 नॉटकिल माईल अंतरावर प्रवास करून परत आल्या होत्या (Tarini film announcement story based on INS Tarini lady officers arushi nishank will play lead character).
या मोहिमेला सुमारे 254 दिवस लागले आणि त्याच वेळी या सहा धडाकेबाज महिला अधिकाऱ्यांचे हे साहस इतिहासाच्या पानांमध्ये नोंदवले गेले. 21 मे 2018 रोजी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पोलंड आणि दक्षिण आफ्रिका मार्गे त्या पुन्हा गोव्याला पोहोचल्या.
तारिणीच्या ‘त्या’ धाडसी महिला अधिकारी
‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार केलेल्या या ‘तारिणी’ बोटीमध्ये स्वार होऊन यशस्वी प्रवास करून आलेल्या या सहा महिला अधिकाऱ्यांनी या साहसी मोहिमेमुळे इतिहासाच्या पानांमध्येही आपली नावे नोंदवली. पंतप्रधानांनीही त्यांच्या या मोहिमेचे खूप कौतुक केले होते. या सहा महिला नेव्ही अधिकाऱ्यांवर आधारित ‘तारिणी’ चित्रपटाची निर्मिती लवकरच सुरू होणार आहे. ‘हिमश्री’ आणि ‘टी-सीरीज’ अंतर्गत बनणाऱ्या या चित्रपटाची घोषणा 8 मार्च 2021 रोजी घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकारांची घोषणा अद्याप झालेली नाही. प्रसिद्ध चित्रपट लेखक प्रसून जोशी यांनी तारिणी चित्रपटाच्या लेखकांच्या टीमचे मार्गदर्शन केले आहे (Tarini film announcement story based on INS Tarini lady officers arushi nishank will play lead character).
केंद्रीय मंत्र्यांच्या लेकीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण!
On the occasion of International Women’s Day, overjoyed with the announcement of Film #Tarini. A historic journey of six undaunted Indian women naval officers who braved storms, conquered fears to sail into history. https://t.co/duYZY3pS3V
— Arushi Nishank (@ArushiNishank) March 8, 2021
या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये आणखी एक नवीन सुंदर चेहरा दिसणार आहे. मॉडेलिंगच्या क्षेत्रात नाव मिळवल्यानंतर आता केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी आरुषि निशंक बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याचे कळते आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी आरुषि निशंक या चित्रपटातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात करणार आहेत. अभिनेत्री किंवा मॉडेल होण्यापूर्वी आरुषि निशंक एक व्यावसायिक कथक नर्तक आहे. याशिवाय आरुषी निशंक महिला सक्षमीकरण, सामाजिक क्षेत्र आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रात सतत कार्यरत असते. याव्यतिरिक्त ती ‘वर्षा गंगा अभियाना’ची राष्ट्रीय संयोजक देखील आहेत.
कोरोना काळामध्ये आत्मनिर्भरतेने प्रेरित, हजारो महिलांना सुई व धाग्याने खादी व कापसाचे मास्क बनवण्याचे प्रशिक्षण व पाठबळ दिले जात आहे. आरुषी निशंक यांनी या कोरोन काळात खादी व कापसाचा हा मास्क सैन्य कर्मचारी, पोलिस आणि कोविड-वॉरियर्सना विनामूल्य वाटप केला. आरुषि निशंक स्वतः ‘हिमश्री’ बॅनरची निर्माती आणि मालक देखील आहे.
(Tarini film announcement story based on INS Tarini lady officers arushi nishank will play lead character)