Farooq Shaikh यांच्या दहा चित्रपटांच्या आठवणीत आजही चाहते रमतात, तुम्हाला ते चित्रपट माहित आहेत का ?
ज्येष्ठ अभिनेते फारूक शेख (Farukh Shaikh) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान स्टार होते. त्यांना चित्रपट, टीव्ही आणि थिएटर यासारख्या विविध व्यासपीठांवर त्यांच्या कामाप्रती समान प्रेम मिळाले. शेख हे त्यांच्या नैसर्गिक अभिनयासाठी ओळखले जात होते. त्यांनी काही संस्मरणीय अभिनय सुध्दा केले आहेत.
मुंबई – ज्येष्ठ अभिनेते फारूक शेख (Farooq Shaikh) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान स्टार होते. त्यांना चित्रपट, टीव्ही आणि थिएटर यासारख्या विविध व्यासपीठांवर त्यांच्या कामाप्रती समान प्रेम मिळाले. शेख हे त्यांच्या नैसर्गिक अभिनयासाठी ओळखले जात होते. त्यांनी काही संस्मरणीय अभिनय सुध्दा केले आहेत. त्यामुळे त्यांची आजही लोक आठवण काढताना आपल्याला पाहायला मिळते. फारुख शेख यांचा जन्म मुंबईतील (Mumbai) वकील मुस्तफा शेख आणि गुजरातमधील (Gujrat) अमरोली येथील फरीदा शेख यांच्या पोटी झाला. फारूख शेख यांनी सेंट मेरी स्कूल, मुंबई येथे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यांनतर पुढचं शिक्षण त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई येथे घेतले. फारूख यांनी रूपा जैन यांच्याशी विवाह केला. परंतु 9 वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं आहे.फारुखची पहिली प्रमुख भूमिका 1973 च्या दरम्यान गरम हवा या चित्रपटात पाहायला मिळाली होती. त्यांनी सत्यजित रे, सई परांजपे, मुझफ्फर अली, हृषीकेश मुखर्जी आणि केतन मेहता यांसारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले. 2010 मध्ये त्यांनी लाहोरसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला. डिसेंबर 2013 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने फारूख शेख यांचं निधन झालं.
फारुख शेख यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या 10 चित्रपटांवर एक नजर टाकणार आहोत.
- गरम हवा (1973)
फारुख शेख यांचा हा डेब्यू चित्रपट होता. या चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर पुरस्कारही जिंकले होते.
- नूरी (1979)
फारुख शेख, पूनम ढिल्लन, मदन पुरी, इफ्तेखार यांची नूरी चित्रपटात भूमिका आहेत. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा 7 वा चित्रपट आहे.
- चश्मे बुद्दूर (1981)
चश्मे बुद्दूर हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. त्यामध्ये फारुख शेख, दीप्ती नवल, राकेश बेदी, रवी बसवानी आणि सईद जाफरी यांची भूमिका आहे. हा चित्रपट सिल्व्हर ज्युबिली हिट ठरला होता.
- उमराव जान (1981)
उमराव जान चित्रपटाचे दिग्दर्शन मुझफ्फर अली यांनी केले होते. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री रेखा आणि फारुख शेख यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
- बाजार (1982)
या चित्रपटाचे दिग्दर्शन सागर सरहदी यांनी केले होते. त्यामध्ये नसीरुद्दीन शाह, फारूक शेख, स्मिता पाटील आणि सुप्रिया पाठक यांनी भूमिका केल्या होत्या. चित्रपटात तरुण मुलींना गरजू पालकांकडून आखाती देशात श्रीमंत भारतीयांना विकल्या जाण्याच्या शोकांतिकेवर प्रकाश टाकण्यात आला होता.
- साथ साथ (1982)
रमण कुमार दिग्दर्शित या चित्रपटात राकेश बेदी, फारुख शेख, नीना गुप्ता, दीप्ती नवल यांनी भूमिका केल्या होत्या.
- किसी से ना कहना (1983)
किसी से ना कहना या चित्रपटाचे दिग्दर्शन हृषिकेश मुखर्जी यांनी केले होते. या चित्रपटात फारुख शेख, दीप्ती नवल आणि उत्पल दत्त यांनी भूमिका केल्या होत्या.
- बीवी हो तो ऐसी (1988)
चित्रपटाचे दिग्दर्शन जे.के. बिहारी यांनी केले आहे. रेखा आणि फारूख शेख यांनी साकारलेल्या मुख्य जोडीभोवती कथा फिरते. शालू (रेखा) ही व्यक्तिरेखा तिच्या वैवाहिक जीवनातील सर्व अडथळ्यांवर मात करून सासूवरती कसा विजय मिळवते अशी कथा आहे.
- सास बहू और सेन्सेक्स (2008)
या चित्रपटाचे दिग्दर्शन शोना उर्वशीने केले होते. फारुख शेख यांनी या चित्रपटात नैतिक पण विक्षिप्त आणि विलक्षण स्टॉक ब्रोकरची भूमिका केली होती.
- ये जवानी है दिवानी (2013) फारुख शेख ये जवानी है दिवानीमध्ये देखील दिसला होता. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होते. फारुख शेख यांनी या चित्रपटात रणबीर कपूरचे वडील ऋषिकांत थापर यांची भूमिका साकारली होती.