“मूर्ख लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका, केजरीवाल उत्तर देण्या लायक नाहीत”, Vivek Agnihotri यांचा Arvind Kejriwal यांच्यावर पलटवार

The Kashmir Files : "टॅक्स फ्री करण्यापेक्षा 'द काश्मिर फाईल्स' हा सिनेमा यूट्यूबवर टाका सगळ्याना तो मोफत पाहता येईल", असं केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांच्या या विधानाला आता या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रत्युत्तर दिलंय. "मूर्ख लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका, केजरीवाल उत्तर देण्या लायक नाहीत", असं अग्निहोत्री म्हणाले आहेत.

मूर्ख लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका, केजरीवाल उत्तर देण्या लायक नाहीत, Vivek Agnihotri यांचा Arvind Kejriwal यांच्यावर पलटवार
विवेक अग्निहोत्री, अरविंद केजरीवाल
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 3:53 PM

मुंबई : ‘द काश्मिर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटावरुन सध्या देशाचं राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालंय. सामाजिक क्षेत्रासोबतच राजकीय मंडळीही या सिनेमाबाबत बोलताना दिसत आहेत. अश्यातच आता दिल्लीच्या विधानसभेतही या सिनेमावर चर्चा झाली. दिल्लीतही भाजपकडून द काश्मिर फाईल्स करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरुन विधानभेत बोलताना आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपलं मत मांडलं. “टॅक्स फ्री करण्यापेक्षा हा सिनेमा यूट्यूबवर टाका सगळ्याना तो मोफत पाहता येईल”, असं केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांच्या या विधानाला आता या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी प्रत्युत्तर दिलंय. “मूर्ख लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका, केजरीवाल उत्तर देण्या लायक नाहीत”, असं अग्निहोत्री म्हणाले आहेत.

अग्निहोत्री भडकले…

अरविंद केजरीवाल यांच्या विधानावर विवेक अग्निहोत्री यांनी आक्षेप नोंदवला. भोपाळमधल्या चित्र भारती फिल्म फेस्टिव्हलला त्यांनी हजेरी लावली. तेव्हा तिथल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या विधानावर आपलं मत मांडलं. त्यांना केजरीवाल यांच्याबाबात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा “काही लोकांना तर असं वाटतं की देवानं पृथ्वीवर यावं. आपण नेहमी अशा मूर्ख लोकांपासून जपून राहायला हवं. त्यांचं म्हणणं मनावर घेऊ नये. त्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही:, असं अग्निहोत्री म्हणाले.

केजरीवाल काय म्हणाले होते?

‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाला मिळणारा लोकांचा प्रतिसाद आणि कमाईच्या आकड्यांवरुन सध्या रोजदार चर्चा होतेय. काही भाजपशासित राज्यात हा चित्रपत करमुक्त करण्यात आलाय. दिल्लीतही भाजपकडून द काश्मिर फाईल्स करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरुन विधानभेत बोलताना आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. “8 वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावे लागले, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्षे त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेलं नाही”, अशा शब्दात केजरीवाल यांनी मोदींवर हल्ला चढवला.

संबंधित बातम्या

Video : Urfi Javed बिकिनी घालून चाफ्याच्या शोधात, नेटकरी म्हणतात “तुला फुलांची नाही, कपड्यांची गरज”

RRR Movie First Day Collection : आरआरआरची पहिल्याच दिवशी कोट्यावधींची कमाई,’The Kashmir Files’लाही टाकलं मागे, परदेशातही करोडोंचा गल्ला!

Iqbal Singh Chahal यांच्या भावाची Sonu Nigam ला धमकी?, अमित साटम यांच्याकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित, चहल म्हणतात “माझा काहीही संबंध नाही!”

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.