The Kerala Story चित्रपटाचा वाद सुरू असतानाच हिंदू जोडप्याने मशिदीत…, AR रहमानने व्हिडिओ केला शेअर!
चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच देशातील वातावरणात तापलं आहे. तसंच तामिळनाडूमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच प्रसिद्ध गायक ए.आर.रहमानने एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
मुंबई : सध्या ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वाद सुरू झाला आहे. केरळमधील अनेक इस्लामिक संघटनांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. तसंच उद्या हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच देशातील वातावरणात तापलं आहे. तसंच तामिळनाडूमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच प्रसिद्ध गायक ए.आर.रहमानने एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
एकीकडे द केरळ स्टोरी हा चित्रपट वादात सापडला असतानाच दुसरीकडे ए.आर. रहमानने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत केरळमधील एका मशिदीत हिंदू जोडप्याने लग्न केल्याचे दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.
सुदीप्तो सेन यांचा ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून वादात सापडला आहे. या चित्रपटात केरळमधील 32 हजार महिलांचे इस्लाममध्ये धर्मांतर करून नंतर दिशाभूल करून त्यांचा दहशतवादी संघटनेत समावेश करण्यात आला, असं दाखवण्या आलं होतं. यावरून हा वाद सुरू आहे. पण नंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी तीन महिलांचं धर्मांतर केल्याचा बदल चित्रपटात केला आहे.
या चित्रपटाच्या निर्मात्यांवर द्वेष पसरवल्याचा आरोप केला जात आहे. तसंच केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनीही या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी या चित्रपटाची कथा खोटी असल्याचं म्हटलं असून द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने हा चित्रपट बनवण्यात आला असल्याचं म्हटलं आहे.
मशिदीत हिंदू जोडप्याचा विवाह
या चित्रपटाच्या वादादरम्यान बॉलीवूड गायक ए.आर.रहमानने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत केरळमधील एका मशिदीत हिंदू जोडप्याने लग्न केल्याचं दिसत आहे. तसंच हा व्हिडीओ शेअर करत रहमाननं लिहिलं की, “उत्कृष्ट, मानवतेवर प्रेम बिनशर्त असले पाहिजे.”
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ए.आर. रहमानने शेअर केलेल्या व्हिडित असा दावा केला जात आहे की, मशिदीत लग्न झालेल्या हिंदू जोडप्यांची नावे अंजू आणि शरत आहे. अंजूच्या आईची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे तिने मस्जिद कमिटीकडे मदत मागितली आणि समितीने तिला मदत केली. यावेळी समितीने मशिदीत लग्नासाठी मंडप सजवला आणि संपूर्ण हिंदू विधींनी हा विवाह पार पडला. तसंच हा विवाह अलप्पुझा येथील चेरुवल्ली जमात मशिदीत पार पडला.