मुंबई : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) याच्या हत्येला आता जवळपास दहा महिने झाले आहेत. 29 मेला सिद्धू मूसेवाला याची हत्या करण्यात आली. भर रस्त्यामध्ये त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर देशभरात भितीचे वातावरण बघायला मिळाले. या गोळीबारात सिद्धू मूसेवाला याचा जागीच मृत्यू झाला. सिद्धू मूसेवाला याच्या हत्येचे अनेक व्हिडीओ (Video) आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. या सर्व प्रकरणामध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याचे नाव समोर आले. काही दिवसांपूर्वीच याप्रकरणात लॉरेन्स बिश्नोई याने मोठा खुलासा केला.
सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर त्याचे कुटुंबिय तुटलेले दिसले. इतकेच नाहीतर सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर सतत त्याच्या वडिलांनाही जीवे मारण्याच्या धमक्या दिसल्या जात आहेत. यापूर्वी त्यांना राजस्थान आणि पंजाबमधून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे याप्रकरणात कारवाई करत पोलिसांनी अनेकांना ताब्यात देखील घेतले आहे.
नुकताच सिद्धू मूसेवाला याचे वडील बलकौर सिंह यांना जीवे मारण्याची धमकी देणारा ईमेल आलाय. या धमकीनंतर मानसा पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. रिपोर्ट्सनुसार, सिद्धू मूसेवाला याच्या वडिलांना यापूर्वी अनेकदा धमकी देण्यात आलीये. हा ईमेल राजस्थानमधून पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच लॉरेन्स बिश्नोई याने जेलमधून एक मोठी धमकी दिलीये. एका चॅनलला बोलताना लॉरेन्स बिश्नोई याने थेट सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर सलमान खान याच्या चाहत्यांना अत्यंत मोठा धक्का बसला. लॉरेन्स बिश्नोई याच्या धमकीनंतर सलमान खान याच्या सुरक्षेमध्येही मोठी वाढ करण्यात आलीये. विशेष म्हणजे लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर लगेचच सलमान खान याला जीवे मारण्याचा मेलही पाठवण्यात आला.
सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने मुंबई पोलिसांनी सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केलीये. इतकेच नाहीतर आपण अशा धमक्याकडे लक्ष देत नसल्याचे म्हणताना देखील सलमान खान हा दिसला. मात्र, समलान खान याला लॉरेन्स बिश्नोई याने थेट जेलमधून धमकी दिल्याने सलमान खान याच्या कुटुंबियांनामध्ये आणि चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. सलमान खान याची हत्या का करायची हे देखील लॉरेन्स बिश्नोई याने सांगितले आहे.