‘राधे’मध्ये दिशा पाटणीला पाहून खुश झाली टायगर श्रॉफची आई, फोटोवर कमेंट करत म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी (Disha Patani) सलमान खान (Salman Khan) याच्या राधे (Radhe) चित्रपटामध्ये त्याची नायिका बनली आहे. या चित्रपटात तिने एका मॉडेलची भूमिका साकारली आहे.

‘राधे’मध्ये दिशा पाटणीला पाहून खुश झाली टायगर श्रॉफची आई, फोटोवर कमेंट करत म्हणाली...
आता दिशाचा हा अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय.
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 11:45 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी (Disha Patani) सलमान खान (Salman Khan) याच्या राधे (Radhe) चित्रपटामध्ये त्याची नायिका बनली आहे. या चित्रपटात तिने एका मॉडेलची भूमिका साकारली आहे. चित्रपटात सलमान खान तिच्यामुळे पहिल्या लूकमुळेच इतका स्तब्ध होतो, की थेट तिच्या प्रेमातच पडतो (Tiger Shroff Mother Ayesha praised disha patani after watching Radhe).

आता टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफने यांनी देखील अशीच काहीशी प्रतिक्रिया दिली आहे. आयशा श्रॉफ यांनी एका टीव्ही चॅनेलच्या पोलमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि या पोस्टवर ‘हार्ट’ इमोजी करून प्रश्नाचे उत्तर दिले. सोबत लिहिलेले, ‘लव्ह इट!!’

दिशाही झाली खुश

त्यांची ही प्रतिक्रिया पाहून दिशा पाटणीसुद्धा खुश झाली आहे. दिशा बर्‍याच वर्षांपासून टायगर श्रॉफला डेट करत होती आणि ती लॉकडाऊनच्या आधी दर आठवड्याला नियमित लंच आणि डिनर डेटला जात होती.

चित्रपटात साकारली जॅकीच्या बहिणीची भूमिका

दिशा पाटणीने ‘राधे’मध्ये टायगरचे वडील जॅकी श्रॉफच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. अविनाश अभ्यंकर बनलेला जॅकी श्रॉफ चित्रपटात विनोदी भूमिका करताना दिसला आहे. चाहते त्याला पाहून खूप हसले आहेत.

सलमानचा हा चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी एक उत्तम करमणूक असल्याचे सिद्ध झाले आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला 4.2 दशलक्ष व्हू मिळाले आहेत, आणि पहिल्याच दिवशी चित्रपटाने ओटीटीवर 100 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या दिवशी भारतातील ओटीटी कमाईचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे (Tiger Shroff Mother Ayesha praised disha patani after watching Radhe).

सलमानसह दुसरी संधी

अभिनेत्री दिशा पाटणी हिच्यासाठी यापेक्षा आणखी आनंदाची बातमी अशी आहे की, तिला सलमान खानबरोबर पुन्हा मुख्य भूमिका मिळाली आणि टायगरच्या कुटुंबीयांनी तिच्या कामाचे कौतुक केले आहे. दिशा ही टायगरची बहीण कृष्णा श्रॉफची चांगली मैत्रिण आहे. दोघींची मैत्री अनेकदा सोशल मीडियावर देखील दिसते. कृष्णा श्रॉफने अद्याप चित्रपटांमध्ये एन्ट्री घेतलेली नाही. परंतु, तिची तयारी पाहता ती कोणत्याही मोठ्या अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाही. तिच्या इन्स्टाग्रामवर दर आठवड्यात बोल्ड फोटो पोस्ट केले जातात.

गेल्या महिन्यात दिशा टायगरबरोबर मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेली होती. तिथून तिने बिकिनी फोटो पोस्ट केले होते जे खूप व्हायरल झाले. टायगरचे कुटुंब आणि दिशा फिटनेसच्या बाबतीत कोणतीही कसर सोडत नाहीत. प्रत्येकाचे लक्ष तंदुरुस्तीवर आहे, यामुळे या कुटुंबाला आता अव्वल सेलिब्रिटींच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. दिशाला कुटुंबीयांनी टायगरची ‘खास मैत्रीण’ म्हणून स्वीकारले आहे.

(Tiger Shroff Mother Ayesha praised disha patani after watching Radhe)

हेही वाचा :

Women Led Series: ‘तिची’ कहाणी, दमदार अभिनय, या 5 वूमन सेंट्रिक वेब सीरीज पाहाच!

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट बनवणार, निर्माते अजित शिरोळेंची दमदार तयारी!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.