मुंबई : इरॉस नाऊने नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी उत्कृष्ट ब्लॉकबस्टर सादर केले आहेत. आपल्या शानदार प्रोजेक्ट्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत, इरोस नाऊने अलीकडेच आपला लोकप्रिय आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘हाथी मेरे साथी’ (Haathi Mere Saathi) रिलीज करण्याची घोषणा केली. या चित्रपटाचे चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत होते.
यासह, प्रेक्षकांच्या उत्साहाची पातळी मोठया उंचीवर नेऊन, अग्रगण्य ओटीटी प्लॅटफॉर्मने आज चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज केला आहे, जो तुमची मने नक्कीच जिंकणार आहे. 18 सप्टेंबर 2021 रोजी इरोस नाऊ प्लॅटफॉर्म आणि झी सिनेमावर हा चित्रपट ट्रेलर एकाचवेळी प्रदर्शित केला आहे.
चित्रपटाच्या सुरुवातीच्या चर्चेमध्ये मिळालेला उत्साह आणि प्रेम लक्षात घेऊन, निर्मात्यांनी हा चित्रपट जगभरात रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्म इरोस नाऊवर गणेश चतुर्थीच्या शुभ निमित्तापेक्षा ट्रेलर रिलीज करण्याचा दुसरा चांगला मुहूर्त तो कोणता…
चित्रपटाचा हा जादुई ट्रेलर तुम्हाला नक्कीच तुमच्या जागेवर खिळवून ठेवेल. 18 सप्टेंबर 2021 रोजी इरॉस नाऊवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु सोलोमन यांनी केले आहे आणि या साहसी चित्रपटात राणा दग्गुबाती आणि पुलकित सम्राट यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. श्रिया पिळगावकर आणि झोया हुसेन देखील चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच्या कार्यक्रमात राणा म्हणाला होता की, या चित्रपटाने त्याला एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत केली आहे. राणा म्हणाला होता की, ‘मला हा चित्रपट करताना अतिशय अभिमान वाटत आहे. या चित्रपटाद्वारे आम्हाला सांगायचे आहे की, शहरीकरणामुळे हत्तींचे काय नुकसान होत आहे.’
सध्या हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा 3 भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. असे म्हटले जाते की, हा चित्रपट पर्यावरण कार्यकर्ते जादव यांच्यावर आधारित आहे, ज्यांना 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
राणा दग्गुबातीने 2010 मध्ये त्याच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. राणा दग्गुबातीचा पहिला चित्रपट ‘लीडर’ होता, ज्याद्वारे अभिनेत्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याचबरोबर बॉलिवूडमध्ये राणाने ‘दम मारो दम’ हा चित्रपट केला.
बॉलिवूडमध्ये राणाने ‘डिपार्टमेंट’, ‘द गाझी अटॅक’, ‘वेलकम टू न्यूयॉर्क’, ‘हाऊसफुल्ल 4’ आणि ‘बेबी’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या वर्षी फक्त राणाचा ‘हाथी मेरे साथी’ रिलीज होईल.
यानंतर, 2022 मध्ये राणा ‘भीमला नायक’ या चित्रपटात दिसणार आहे. राणा व्यतिरिक्त पवन कल्याण, नित्या मेनन आणि ऐश्वर्या राजेश या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
रणवीर सिंह-दीपिका पदुकोणची अलिबागमध्ये महागडी शॉपिंग! खरेदी केली तब्बल 90 गुंठे जागा!