दोन अफेअर,10 वर्ष रिलेशनशिप; तरीही 53 वर्षीय तब्बू सिंगलच का राहिली? कारण विचारताच अभिनेत्रीनं घेतलं तिसऱ्याचं अभिनेत्याचं नाव
बॉलिवुड सेलिब्रेटी आपल्या नातेसंबंधांबाबत कधीच स्पष्टपणे बोलत नाहीत. तब्बू आणि नागार्जुनने देखील असचं केलं. मात्र दोघांच्या प्रेमसंबंधांची जोरदार चर्चा झाली.
बॉलिवुड सेलिब्रेटी आपल्या नातेसंबंधांबाबत कधीच स्पष्टपणे बोलत नाहीत. तब्बू आणि नागार्जुनने देखील असचं केलं. मात्र दोघांच्या प्रेमसंबंधांची जोरदार चर्चा झाली. प्रेमसंबंधांमुळे दोघंही चांगलेच चर्चेत आले. नागार्जुनने आधीच लग्न केलं होतं. मात्र असं असताना देखील दोघ एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेक वर्ष त्यांनी एकमेकांची साथ दिली.त्यानंतर ते वेगळे झाले.मात्र त्यानंतर अभिनेत्री तब्बून कोणासोबतच लग्न केलं नाही, सिंगल राहाणच तीने पसंत केलं.
नागार्जुनच नाही तर नागार्जुनची दुसरी पत्नी अमला आणि तब्बू देखील एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. नागार्जुन जेव्हा 21वर्षांचा होता तेव्हापासून तब्बू आणि नागार्जुनची ओळख होती.नागार्जुन जेव्हा 21वर्षांचा होता तेव्हा तब्बू 16 वर्षांची होती.’निन्ने पेल्लाडता’या चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिल्यांदा ओळख झाली. त्यानंतर हळूहळू ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं.
तब्बू आणि नागार्जुनमधील मैत्रीबाबत नागार्जुनची दुसरी पत्नी अमलाने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, मला पूर्ण विश्वास आहे की, नागार्जुन माझ्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.माझ्या घरात काय चाललं आहे? याची चिंता दुसऱ्याला करण्याची आवश्यकता नाहीये.
तब्बूला जेव्हा तीच्या लग्नाबाबत विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली होती की मी अजय देवगनमुळेच सिंगल राहिले.तीने हे गंमतीनं म्हटलं होतं.पुढे बोलताना ती म्हणाले की मी अजयला अनेक वर्षांपासून ओळखते. तब्बूचा चुलत भाऊ समीर हा अजय देवगनचा चांगला मित्र आहे. जो पण तब्बूसोबत बोलेल त्या मुलाला अजय देवगन आणि समीर धमक्या देत होते,अशी ही माहिती समोर आली आहे. तब्बू नागार्जुन व्यतिरिक्त संजय कपूरसोबत देखील सीरियस रिलेशनशिपमध्ये होती. मात्र तरी देखील ती सिंगल आहे. तीला जेव्हा तिच्या लग्नाबाबत विचारण्यात आलं तेव्हा तीने अजय देवगनचं नाव घेतलं, मात्र हे ती सर्व गमतीमध्ये बोलत होती. तरी देखील तिच्या या वक्तव्याची चर्चा झाली. तिचा चुलत भाऊ आणि अजय देवगन हे चांगले मित्र आहेत, अजयने काजोलशी लग्न केलं.