‘पुष्पा आय हेट टीयर’ म्हणत राजेश खन्नांनी गाजवला मोठा पडदा, वाचा ‘या’ डायलॉगची मनोरंजक कथा!

दिग्दर्शक शक्ती सामंत यांचा 1972मध्ये प्रदर्शित ‘अमर प्रेम’ (Amar Prem) हा चित्रपट रसिक प्रेक्षक कधीच विसरू शकत नाहीत. या चित्रपटात राजेश खन्ना आणि अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) मुख्य भूमिकेत दिसले होते.

‘पुष्पा आय हेट टीयर’ म्हणत राजेश खन्नांनी गाजवला मोठा पडदा, वाचा 'या' डायलॉगची मनोरंजक कथा!
अमर प्रेम
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 9:53 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांचे नाव कानावर येताच असंख्य चित्रपट मनात डोकावतात. राजेश खन्ना बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार होते. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांच्या काळात या अभिनेत्याने आपल्या बहारदार अभिनयाने कलाकृतीत रंग भरले होते. एक काळ असा होता की, तरुणी राजेश खन्ना यांच्या एका झलकेसाठी वेड्या होत, झोपताना उशाखाली त्यांचे फोटो ठेवून झोपत. राजेश खन्ना यांच्या चित्रपटांचे संवादही असे बहारदार होते की, आजपर्यंत ते चाहत्यांच्या तोंडी ऐकू येतात (Unknow story behind the iconic dialogue Pushpa I hate tear from Amar Prem Movie).

दिग्दर्शक शक्ती सामंत यांचा 1972मध्ये प्रदर्शित ‘अमर प्रेम’ (Amar Prem) हा चित्रपट रसिक प्रेक्षक कधीच विसरू शकत नाहीत. या चित्रपटात राजेश खन्ना आणि अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाची कथा, गाणी, अभिनय, संवाद या सर्वांना चाहत्यांची खूप पसंती मिळाली होती.

‘अमर प्रेम’ गाजलेल्या संवादाची कथा

‘अमर प्रेम’ या चित्रपटामधील ‘पुष्पा आय हेट टियर’ (Pushpa I hate tear ) हा प्रसिद्ध संवाद आजही लोकांना आठवत आहे. या संवादाशिवाय हा चित्रपट स्वतः देखील अपूर्ण आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 49 वर्षे उलटली तरी, ‘पुष्पा आय हेट टियर’ हा राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांचा संवाद तितकाच प्रसिद्ध आहे.

या आयकॉनिक डायलॉगच्या मागे एक मनोरंजक कथा लपलेली आहे. ‘अमर प्रेम’ चित्रपटाचे संवाद लेखक अरविंद मुखर्जी हे मूळचे बंगाली होते. विशेष म्हणजे बंगाली असल्याने त्यांचे हिंदी फारसे चांगले नव्हते. असे म्हणतात की, त्यांनी या चित्रपटाची पटकथा चक्क इंग्रजीमध्ये लिहिली होती (Unknow story behind the iconic dialogue Pushpa I hate tear from Amar Prem Movie).

स्क्रीन प्लेचे झाले भाषांतर!

View this post on Instagram

A post shared by @oldbollywoodfan

नंतर संपूर्ण स्क्रीन प्लेचे भाषांतर झाले. हा अनुवाद लेखक रमेश पंत यांनी केला आणि चित्रपटाचे हिंदी संवादही त्यांनीच लिहिले. त्यानंतर त्यांनी चित्रपटाच्या सर्व लाईन्सचे भाषांतर केले होते. परंतु ‘पुष्पा आय हेट टियर’ हे वाक्य त्यांना खूप आवडले आणि त्यांनी ते तसेच राहू दिले.

त्यावेळी हा संवाद पुढे इतका प्रसिद्ध होईल, ही कल्पना फारशी कोणाला आली नसेल. बर्‍याच काळापासून ‘अमर प्रेम’चा हा सिग्नेचर डायलॉग, हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा आयकॉनिक डायलॉग म्हणून चर्चेत आहे.

नावाप्रमाणेच ठरला अमर!

‘अमर प्रेम’ हा चित्रपट ‘निशिपद्मा’ या बंगाली चित्रपटावर आधारित होता आणि असे म्हणतात की आनंद बाबूची भूमिका साकारण्यापूर्वी राजेश खन्ना यांनी तब्बल 24 वेळा हा लोकप्रिय चित्रपट पाहिला होता. या चित्रपटाची कथा विभूती भूषण बॅनर्जी यांनी लिहिली होती. ‘अमर प्रेम’ हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटात शर्मिला टागोर यांनी एक वेश्या आणि राजेश खन्ना यांची एकांतात राहणाऱ्या व्यापाऱ्याची भूमिका साकारली होती. चित्रपटात एका मुलाच्या कथेला शर्मिला आणि राजेश खन्ना यांच्या भोवती फिरवले गेले होते. आजही चाहत्यांना ‘अमर प्रेम’ हा चित्रपट पाहायला आवडतो.

(Unknow story behind the iconic dialogue Pushpa I hate tear from Amar Prem Movie)

हेही वाचा :

Video | शूटिंगवर असलेल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला भाजायला लागले सुके बोंबील, पाहा काय म्हणाली…

Video | अली गोनीशी लग्न करण्याबाबत जास्मीन भसीनचा मोठा निर्णय, ऐकून चाहतेही झाले निराश!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.